शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:55 IST

घोटाळ्यातील कृषी सहायक व ग्रामसेवक देखील रडारवर आले आहेत. त्यांच्यावर देखील येत्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे.

जालना : शेतकरी अनुदान वाटप घोटाळा उघड झाल्यानंतर ८९ कर्मचारी प्राथमिक चौकशीत दोषी आढळले आहेत. यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांचा समावेश आहे. यानंतर प्रशासनाकडून १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, असे संकेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नियोजन समितीच्या बैठकीवेळी दिले होते. यानंतर अंबड व घनसावंगी तालुक्यातील आजी माजी पाच तहसीलदार व पाच नायब तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. यातील दोन अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे खुलासे सादर केलेले आहेत. घोटाळ्यातील कृषी सहायक व ग्रामसेवक देखील रडारवर आले आहेत. त्यांच्यावर देखील येत्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे.

२०२२ पासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करण्यात आले आहे. मात्र, अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी चौकशीची मागणी केल्यानंतर प्रशासनाने तीन सदस्यी चौकशी समिती नेमून अनुदान वाटपाची चौकशी सुरू केली होती. चौकशी समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संगमत करून हडप केल्याचे उघड झाले होते.

दहा तलाठ्यांचे निलंबनअनुदान घोटाळ्यात ८९ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. यानंतर प्रशासनाने दोषी आढळलेल्या तलाठ्यांना नोटीस पाठवून खुलासे मागितले होते. समाधानकाकर खुलासे नसल्यामुळे प्रशासनाने दहा तलाठ्यांना निलंबित केले होते. यानंतर उर्वरित तलाठ्यांच्या निलंबनाची कारवाई प्रशासनाकडून सुरू आहे. मंगळवारी आणखी काही तलाठ्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

अधिकारी रडारवरअनुदान वाटप घोटाळा उघड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत अनुदान लाटण्यात आले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दहा अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून खुलासे मागितले आहेत. यात पाच तहसीलदार व पाच नायब तहसीलदारांचा समावेश आहे. अंबड-घनसावंगी तालुक्यातील सध्या कार्यरत असलेले, तसेच यापूर्वीच्या १० अधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आलेली आहे. समाधानकारक खुलासे नसल्यास त्यांच्यावर देखील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभागAgriculture Sectorशेती क्षेत्र