शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील ४०० एकरवरील भव्य ड्रायपोर्टचे काम पूर्ण, पण एनओसीअभावी प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:00 IST

देशातील पहिल्या जालना ड्रायपोर्टचे संचलन लांबणीवर; प्रदूषण मंडळाची एनओसी आणि रेल्वे कागदपत्रांमुळे खोळंबा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जालना ड्रायपोर्टचे संचलन महिनाभर लांबणीवर पडल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक ना हरकत प्रमाणपत्र आणि रेल्वेसंबंधित किरकोळ कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब झाल्याने ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्यास वेळ लागत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

जालना येथे उभारण्यात आलेला ड्रायपोर्ट एप्रिल महिन्यापासून कार्यान्वित होईल असे बोलले जात होते. हा ड्रायपोर्ट कार्यान्वित झाल्यास छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतील उद्योजक, शेतकरी यांना त्यांचा निर्यातक्षम माल विदेशात पाठवणे सहज शक्य होणार आहे. मराठवाड्यातून सुमारे २५ ते ३० हजार कोटी रुपये किमतीच्या मालाची निर्यात दरवर्षी होत असते. मात्र, हा माल आतापर्यंत कंटेनर, ट्रकमधून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पाठविला जातो. तेथे कस्टम क्लिअरन्स झाल्यानंतर माल विदेशात पाठविला जातो. जेएनपीटीमधून माल निर्यात करताना उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सन २०१४पासून जालना शहराजवळच ४००एकरवर ड्रायपोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या ड्रायपोर्टचे काम पूर्ण झाले.

६४ एकर परिसरात ड्रायपोर्टसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. दिनेगाव ते ड्रायपोर्ट अशी स्वतंत्र रेल्वेलाईन टाकण्यात आली. उभारण्यात आलेल्या ड्रायपोर्ट मध्येच कस्टम विभागाचे कार्यालय आहे. तेथून रेल्वेने अथवा कंटेनरमधून थेट माल जहाजावर पाठविणे शक्य होणार आहे. यामुळे मराठवाड्यासाठी हा ड्रायपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. विकास कोल या खासगी कंपनीकडे १५ वर्षांसाठी या ड्रायपोर्टचे संचलन सोपविण्यात आले आहे.

एनओसी मिळताच ड्रायपेार्ट सुरू
जालना ड्रायपोर्टसाठी स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाची एनओसी आणि रेल्वे विभागाशी संबंधित काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब झाल्याने ड्रायपोर्टचे संचलन करता आले नाही. पुढील काही दिवसांत ही पूर्तता करून एनओसी मिळताच ड्रायपेार्ट सुरू होईल.
-विकास मलिक, वरिष्ठ अधिकारी, एमएमएलपी.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Dryport Ready, Awaits NOC for Operations to Commence

Web Summary : Jalna's 400-acre dryport, crucial for Marathwada's exports, is complete but awaits necessary NOC. Once operational, it will significantly ease export processes for regional businesses and farmers, saving time and money. The dryport is set to revolutionize trade.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना