अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार - रफिक पारनेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:57+5:302021-02-05T07:58:57+5:30

रांजणी : अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार आहे, मानवाला जीवनाचा उद्देश समजला नाही, त्यामुळेच तो ...

Ignorance is the biggest darkness in human life - Rafiq Parnerkar | अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार - रफिक पारनेरकर

अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार - रफिक पारनेरकर

रांजणी : अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार आहे, मानवाला जीवनाचा उद्देश समजला नाही, त्यामुळेच तो भटकत आहे, असे मत डॉ. रफिक पारनेरकर यांनी व्यक्त केले. जमाते इस्लामी हिंदतर्फे घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे सोमवारी अंधारातून प्रकाशाकडे अभियानाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मिर्झा फरहतुल्ला बेग, मौलाना अब्दुल खुद्दूस आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पारनेरकर म्हणाले की, प्रत्येक मानवाला मृत्यूनंतर स्वत:च्या कर्माचे फळ भोगावे लागणार आहे, हे ध्यानात घेऊन जीवनाचा उद्देश समजावून घ्यावा. प्रारंभी हाफीज हसनुल बन्ना याने कुराण पठण केले. सूत्रसंचालन शेख अब्दुल रहिम यांनी तर आभार मोहसिन इकबाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमाते इस्लामी हिंदच्या स्थानिक पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Ignorance is the biggest darkness in human life - Rafiq Parnerkar