पानटपरीतून ३६ हजार रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:03+5:302021-07-02T04:21:03+5:30

शेख जावेद शेख रहीम असे संशयित आरोपीचे नाव आहे. जालना शहरातील मिलन चौक येथील अजंठा पान सेंटरवर राज्यात ...

Gutkha worth Rs 36,000 seized from Pantpari | पानटपरीतून ३६ हजार रुपयांचा गुटखा जप्त

पानटपरीतून ३६ हजार रुपयांचा गुटखा जप्त

शेख जावेद शेख रहीम असे संशयित आरोपीचे नाव आहे.

जालना शहरातील मिलन चौक येथील अजंठा पान सेंटरवर राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. नागवे यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून पानटपरीची झाडाझडती घेतली असता, राज्यात बंदी असलेला गोवा, रजनीगंधा पान मसाला, वजीर पान मसाला, प्रीमिअम राजनिवास, रॉयल जाफरानी नावाच्या गुटख्याचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी तब्बल ३६ हजार ७५० रुपयांचा गुटखा जप्त केला. शिवाय, आरोपी शेख जावेद शेख रहीम यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवाजी नागवे, पोलीस नाईक कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, विलास चेके, शमशाद पठाण, सूरज साठे आदींनी केली आहे.

Web Title: Gutkha worth Rs 36,000 seized from Pantpari