जालना मर्चंट बँकेच्या अंबड शाखेत घोटाळा; ९६ लाखांचे बनावट डागिने आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:09 IST2026-05-02T15:06:57+5:302026-05-02T15:09:10+5:30

बँकेच्या २० पिशव्यांमधील सोने बदलले! शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट.

Gold Loan Scam Unearthed at Jalna Merchant Bank's Ambad Branch; Original Gold Replaced with Fake Jewelry | जालना मर्चंट बँकेच्या अंबड शाखेत घोटाळा; ९६ लाखांचे बनावट डागिने आढळल्याने खळबळ

जालना मर्चंट बँकेच्या अंबड शाखेत घोटाळा; ९६ लाखांचे बनावट डागिने आढळल्याने खळबळ

अंबड: जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेतून ग्राहकांचे अस्सल सोने गायब करून त्या जागी बनावट दागिने ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारदार अमोल गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, त्यांच्या तक्रारीवरून शाखेतील एकूण ९६ लाख ४१ हजार ६५० रुपये मूल्याच्या सोन्याची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासणीत २० पिशव्या बनावट
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन अनिल केळकर यांनी २१ एप्रिल रोजी शाखेला भेट देऊन पडताळणी केली असता, कर्जदारांच्या २० पिशव्यांमधील सोन्याचे दागिने बनावट असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, बँकेचे व्यवस्थापक आणि काही कर्मचारी रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या तारण सोने आणि रोख रक्कम हाताळताना आढळून आले होते.

तिघांना अटक, संचालक मंडळावरही गुन्हे
या गंभीर प्रकरणी अंबड पोलिसांनी शाखा व्यवस्थापक रामप्रसाद जगन्नाथ जाजू, शिपाई सोमनाथ मनोहर नसवाले आणि कॅशियर अंगद गणेश येवले यांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त बँकेचे महाव्यवस्थापक, सर्व संचालक मंडळ आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Web Title: Gold Loan Scam Unearthed at Jalna Merchant Bank's Ambad Branch; Original Gold Replaced with Fake Jewelry