नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:22+5:302021-02-16T04:32:22+5:30

शेख समीर शेख कादीर (रा. जवाहर कॉलनी जिंतूर जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. शेख याने रेल्वे, पोस्ट ऑफिस, ...

Fraud of educated unemployed by showing job lure | नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक

शेख समीर शेख कादीर (रा. जवाहर कॉलनी जिंतूर जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. शेख याने रेल्वे, पोस्ट ऑफिस, तलाठी म्हणून नोकरी दाखविण्याचे अामिष दाखवून आठ युवकांकडून तीन लाख सहा हजार रुपये फोन पे-, गुगल- पेद्वारे घेतल्याची तक्रार सुनीता भगवान काटकर (रा. परतूर) यांनी परतूर ठाण्यात दिली. शेख याने महेश संतोष वानखेडे याच्याकडून एक लाख रुपये, मयुरी राम गावंडे यांच्याकडून एक लाख रुपये, संगीता उबाळे यांच्याकडून १६ हजार रुपये, अशोक उत्तमराव जाधव यांच्याकडून ३० हजार रुपये, मंगल कोरडे यांच्याकडून २० हजार रुपये, सुनीता काटकर यांच्याकडून २० हजार रुपये, विनायक जईद, किशोर विठ्ठल सोळंके यांच्याकडून २० हजार रुपये असे एकूण तीन लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून शेख समीर शेख कादीर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि बोडखे हे करीत आहेत.

Web Title: Fraud of educated unemployed by showing job lure