कोरोना राेखण्यासाठी शिस्त पाळा.. अन्यथा दंडाचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:32 AM2021-02-24T04:32:39+5:302021-02-24T04:32:39+5:30

गेल्या महिन्यापासून कोरोनाने हळू-हळू आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण घटल्याने तो हद्दपार झाला, या अविर्भावात ...

Follow the discipline to keep the corona .. otherwise the penalty budga | कोरोना राेखण्यासाठी शिस्त पाळा.. अन्यथा दंडाचा बडगा

कोरोना राेखण्यासाठी शिस्त पाळा.. अन्यथा दंडाचा बडगा

Next

गेल्या महिन्यापासून कोरोनाने हळू-हळू आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण घटल्याने तो हद्दपार झाला, या अविर्भावात आपण सर्वजण होतो. परंतु हा समज खोटा ठरवत कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाली आहे. त्याला आपण सर्वजण जबाबदार असून, गर्दी टाळण्याऐवजी सर्चच सोहळे धूमधडाक्यात होत आहेत. त्याचा परिणाम पुन्हा एकदा नव्याने रुग्णवाढीवर होत आहे. गर्दीसह वातावरणातील अचानक झालेला बदलदेखील या कोरोना वृद्धीसाठी पोषक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला असेल तर ही बाब गंभीरतेने घेऊन लगेचच स्वत:ची कोरोना चाचणी करून घेण्याकडे कल असण्याऐवजी ती टाळण्याकडे नागरिकांचा ओढा जास्त असल्याने मध्यंतरी चाचण्यांची संख्या ही रोडावली होती; परंतु आता रुग्णवाढीमुळे संशयितांची चाचणी आता करणे अनिवार्य केले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे प्रभागात जाऊन आरोग्य कर्मचारी तपासणी करत होते. ते आता करणे शक्य नसले तरी सर्दी आणि तापाच्या रुग्णांनी दुर्लक्ष हे त्यांच्यासह त्यांच्या परिवारासाठी देखील गंभीर ठरू शकते. या बैठकीस पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, निवासी उपजिल्हािकारी केशव नेअके, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह डॉ. कडले आणि अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

दहावी, बारावीवे वर्ग सुरू राहणार

आज झालेल्या आपत्ती निवारण बैठकीत दहावी आणि बारावीचे वर्ग परीक्षा असल्याने ते सुरू ठेवण्यावर निर्णय झाला. परंतु तेथे देखील कोराना होऊ नये म्हणून सर्व निकष आणि बंधने पाळणे गरजेचे आहे. अन्य शाळा, खासगी कोचिंग क्लासेस हे ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश आहेत. यासह आठवडी बाजार, यात्रा रद्द करण्यात आल्या असून, आंदोलन, मोर्चे रद्द केले आहेत.

चौकट

विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क लावून पडावे. यासाठी जालना शहरासह जिल्ह्यातील लहान-मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जालन्यात अशी दहा पथके राहणार असून, त्यात शिक्षक, पोलीस कर्मचारी आणि जालना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. सुरक्षित अंतर न पाळल्यास २०० रुपये तर विनामास्क फिरताना आढळल्यास ५०० रुपये दंड म्हणून वसूल करावेत, असे निर्देश बिनवडे यांनी दिले आहेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही बुधवारपासून अंमलात येणार आहे.

Web Title: Follow the discipline to keep the corona .. otherwise the penalty budga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.