वडीगोद्री-जालना मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कंटेनरच्या भीषण अपघातात चालकाचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:58 IST2026-05-13T11:57:51+5:302026-05-13T11:58:32+5:30

वडीगोद्री-जालना मार्गावर कंटेनर पलटी; चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात, राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू.

Fatal Accident on Wadigodri-Jalna Road: Container Overturns Near Dhakalgaon; Driver from Rajasthan Killed | वडीगोद्री-जालना मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कंटेनरच्या भीषण अपघातात चालकाचा अंत

वडीगोद्री-जालना मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कंटेनरच्या भीषण अपघातात चालकाचा अंत

वडीगोद्री (जि. जालना): जालन्याहून बीडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला (क्रमांक HR 55 AU 5172) वडीगोद्री-जालना मार्गावरील धाकलगाव जवळ भीषण अपघात झाला. बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कंटेनर चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव मोहम्मद कैफ अली शेर (वय ३२, रा. भरतपूर, राजस्थान) असे आहे. अपघाताची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण हावले आणि पोलीस कर्मचारी शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताचा देह शवविच्छेदनासाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे.

स्थानिकांमध्ये संताप
वडीगोद्री-जालना मार्गावर सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. रस्ता खराब असणे आणि वाहनांचा वेग जास्त असणे, ही अपघातांची मुख्य कारणे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर रस्ता सुरक्षिततेसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title : जालना-वडीगोद्री मार्ग पर दुर्घटनाएँ जारी: कंटेनर दुर्घटना में चालक की मौत

Web Summary : जालना-वडीगोद्री मार्ग पर एक कंटेनर दुर्घटना में राजस्थान के चालक मोहम्मद की जान चली गई। चालक को नींद आने के कारण कंटेनर पलट गया। स्थानीय लोग लगातार हो रही दुर्घटनाओं से नाराज हैं, खराब सड़क की स्थिति और गति को प्राथमिक कारण बताते हुए सुरक्षा उपायों की मांग कर रहे हैं।

Web Title : Jalna-Wadigodri Accidents Continue: Container Collision Kills Driver

Web Summary : A container accident on the Jalna-Wadigodri road claimed the life of the driver, Mohammad, from Rajasthan. The container overturned after the driver reportedly fell asleep. Locals are angered by frequent accidents, citing poor road conditions and speeding as primary causes, demanding safety measures.