पारध येथे विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:59+5:302021-02-05T07:58:59+5:30

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन ...

Distribution of free masks to students at Pardh | पारध येथे विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप

पारध येथे विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन चव्हाण यांच्या वतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. २७ जानेवारीपासून पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. शालेय समितीचे अध्यक्ष भगवान देशमुख, मुख्याध्यापक नामदेव पाडळे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी देवेंद्र लोखंडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

फोटो

वसंतराव काळे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जालना : येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व. शिक्षक आमदार वसंतराव काळे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रो. डॉ. सुखदेव मांटे, अध्यक्षा रेवती मांटे, प्राचार्या लतिका मनोज यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वसंतराव काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Distribution of free masks to students at Pardh