शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

मंठा : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी शहरातील बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे ...

मंठा : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी शहरातील बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे अनुदान काढण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.

प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यापासून बँक आणि प्रशासकीय कार्यालयात कामाचा बोजवारा उडाला आहे. शासनाने कामाच्या वेळा वाढविल्या असल्या तरी कर्मचारी वेळेवर कार्यालयात येताना दिसत नाहीत. याचा परिणाम कामावर होत असून, कुठलीच कामे पूर्ण होत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने अनुदान वाटपास विलंब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भोंगळ कारभार सुरू आहे. ठराविक खातेदारांनाच पैसे दिले जात आहेत. काही शेतकऱ्यांना तासन्‌तास उभे केले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी सुभाष घारे यांनी केली आहे.

वरिष्ठांच्या आदेशावरून आम्ही गावांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे अनुदान वाटप केले जात आहे. तीन दिवस सुट्या असल्याने अनुदान वाटप करता आले नाही, असे बँकेच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.

फोटो

मंठा शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.