शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण मोहीम; जालन्यात तीन केंद्रांवर होणार ड्राय रन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:42 IST

coronavirus vaccine लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे ड्राय रन होणार आहे.

ठळक मुद्देया ड्राय रनसाठी आरोग्य विभागातील ७५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. प्रत्येक केंद्रावर डॉक्टरांसह ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ड्राय रन होणार असून, यासाठी ७५ कर्मचाऱ्यांची निवड केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.

लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे ड्राय रन होणार आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुरुवात होईल. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब यांनी ड्राय रनमध्ये सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या ड्राय रनसाठी आरोग्य विभागातील ७५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या ७५ जणांना तासभराअगोदरच मोबाइल मेसेज येईल. त्यानंतरच त्यांना लसीकरणासाठी येता येईल. प्रत्येक केंद्रावर डॉक्टरांसह ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांचा समावेश आहे. लसीकरणासाठी तीन रूम तयार केल्या आहेत. हा ड्राय रन बारा वाजेपर्यंत चालणार असल्याचेही डॉ. खतगावकर यांनी सांगितले.

अशी दिली जाणार लसलसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीस मोबाइलवर मेसेज येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी संबंधित व्यक्तीचा मोबाइलवर आलेला मेसेज पाहूनच त्याला केंद्रात सोडतील. पहिल्या खोलीत कागदपत्रांची तपासणी केली जाईल. दुसऱ्या खोलीमध्ये लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या खोलीत लसीकरण झालेल्या व्यक्तीस अर्धा तास निगराणीत ठेवले जाईल. त्यानंतर शिक्षक कोविड ॲपवर संबंधित व्यक्तीची माहिती भरणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

यांच्यावर राहील जबाबदारीडॉक्टर, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांच्यावर लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना तसे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस