शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायपोर्टमुळे 'बूस्ट'; जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर आणखी रेल्वेस्थानक सेवेत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:35 IST

माल वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठीदेखील हे रेल्वे स्थानक उपयोगी ठरणार आहे.

- शिवाजी कदम

जालना :जालना ते छत्रपती रेल्वे मार्गावर दिनेगाव हे रेल्वे स्थानक लवकरच सेवेत येणार आहे. काही वर्षांपूर्वी प्रवासी संख्येअभावी हे स्थानक बंद करण्यात आले होते. आता जालना येथील ड्राय पोर्ट लवकरच कार्यान्वित होणार असल्याने या स्थानकावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. माल वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठीदेखील हे रेल्वे स्थानक उपयोगी ठरणार आहे. दिनेगाव ते ड्राय पोर्ट दरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रेल्वे मार्गावर बुधवारी डिझेल इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या ट्रायलमुळे जालना ड्राय पोर्ट प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

रेल्वे रुळांची मजबुती, वळणे, सिग्नलिंग यंत्रणा आणि सुरक्षा मानकांची काटेकोर तपासणी करणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. ड्राय पोर्ट सुरू होण्यापूर्वीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक टप्पा मानला जात आहे.

१ मे रोजी उद्घाटनाची शक्यताजालना जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या या ड्राय पोर्टचे उद्घाटन येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्याचे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची शक्यता असून, अद्याप अधिकृत कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे.

आयात-निर्यातीला येणार मोठे उधाणजालना शहराजवळील दरेगाव येथे ४९५ एकर जागेवर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांनी संयुक्तपणे हे ड्राय पोर्ट विकसित केले आहे. येथे कंटेनर यार्ड, वेअर हाऊस आणि लिफ्टिंग टर्मिनस यासारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी दिनेगाव रेल्वे स्थानकाचा वापर होणार आहे.

दिनेगाव रेल्वे स्थानकाचे उजळणार भाग्य!सध्या दिनेगाव रेल्वे स्थानकावर एकही पॅसेंजर रेल्वे थांबत नाही. कारण, आजूबाजूला मोठी वस्ती नाही. मात्र, ड्राय पोर्ट सुरू झाल्यानंतर या स्थानकाचे महत्त्व प्रचंड वाढणार आहे. भविष्यात येथे गाड्या थांबतील आणि स्थानिक नागरिक रोजगारासाठी येथून जालन्याला ये-जा करू शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Industrial boost: Jalna-Sambhajinagar railway line to get new station.

Web Summary : Dinegaon station reopens on Jalna-Sambhajinagar line, boosting industrial development. The station will support the upcoming Jalna Dry Port, facilitating both freight and passenger transport. Trial runs successful; opening is expected May 1st.
टॅग्स :MIDCएमआयडीसीJalanaजालनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर