बोलेरो चोरणारा अटकेत ; कदीम जालना पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:37+5:302021-02-05T07:58:37+5:30

जालना : नूतन वसाहत परिसरात उभी केलेली बोलेरो चोरणाऱ्यास कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. राहुल राधेशाम वाघमारे (वय ...

Bolero thief arrested; Kadim Jalna police action | बोलेरो चोरणारा अटकेत ; कदीम जालना पोलिसांची कारवाई

बोलेरो चोरणारा अटकेत ; कदीम जालना पोलिसांची कारवाई

जालना : नूतन वसाहत परिसरात उभी केलेली बोलेरो चोरणाऱ्यास कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. राहुल राधेशाम वाघमारे (वय २२, रा. पार्शी गल्ली, काद्राबाद) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो जप्त करण्यात आली.

आनंद गणपतराव जोशी (रा. आनंदवाडी काॅलनी, नूतन वसाहत) यांनी बोलेरो चोरी गेल्याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना, नूतन वसाहत येथून चोरी गेलेली बोलेरो राहुल वाघमारे याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बोलेरो गाडी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. प्रशांत महाजन, पोना मनोज हिवाळे, संतोष अंभोरे, किरण चेके, बाबा गायकवाड, रामेश्वर राऊत, कैलास चेके, कांगणे आदींनी केली.

Web Title: Bolero thief arrested; Kadim Jalna police action