शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

बियाणे उत्पादक कंपन्यांचा दगा; मोजक्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 7:21 PM

आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.  

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांची तक्रार

जालना : मागील काही वर्षात यंदा प्रथमच जून महिन्याच्या प्रारंभी निसर्ग शेतकऱ्यांवर मेहरबान झाला होता. परंतु, बियाणे उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कृषी विभागाने काढला होता. परंतु, आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.  

यंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यात हजारो शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने त्याची उगवण क्षमता चांगली झाली नाही. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. यात आजवर महाबीजच्या वतीने ७८ शेतकऱ्यांना ४ लाख १५ हजार १४० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही खासगी कंपन्यांनी ५८ बियाणांच्या बॅगांचे वाटप करून ८७ शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार ६१० रूपयांची भरपाई दिली आहे. तर काही प्रकरणे प्रक्रीयेमध्ये असून, तेही लवकरच निकाली निघतील, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

या बियाणांसंदर्भात तक्रारी दाखलयंदा जिल्ह्यात कापसाची लागवड ३ लाख ८ हजार २६८ हेक्टरवर झाली होती. तर मका ४२ हजार १७३ तर सोयाबीनचा पेरा १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर झाला होता. परंतु, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले होते. याबाबत २ हजार ७४० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

बियाणे कंपन्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोयाबीनचे बोगस बियाणे विकल्याचा ठपका ठेवत आजवर जिल्ह्यात १५ कंपन्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सालासर कृषी ग्रोअर कंपनी, पिपलीयामंडी (म.प्र), पतंजली बायो रिसर्च, उत्तराखंड, अंकुर सिडस् प्रा.लि., यशोदा हायब्रीड सिडस् प्रा.लि. वर्धा, इगल सिडस ॲण्ड बायोटेक लि. इंदौर, ग्रीन गोल्ड सिडस् कंपनी औरंगाबाद, दिव्य क्रांती सिडस् कंपनी जालना, हरित क्रांती सिडस् कंपनी देऊळगाव राजा, मे. ओस्वी सिडस् इंदाैर, म. प्र, सागर ॲग्रो इनपूट जगदेवगंज, आलोटे, रतमाल म.प्र. आदी कंपन्यांचा समावेश आहे. 

सोयाबीनच्या बोगस बियाणांसदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. यातील काही शेतकऱ्यांना महाबिजच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या पावतीवरील लॉट नंबर मॅच होत नाही. त्यामुळे बियाणांची भरपाई देण्यास विलंब लागत आहे. तसेच अनेक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. - बी. आर. शिंदे, कृषी अधिकारी 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र