शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करुन ३३ लाख वटविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:04 IST

जालना जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्याच्या दालनातून सहा धनादेशाची चोरी

ठळक मुद्देलेखा अधिकाऱ्याच्या दालनातून सहा धनादेशाची चोरी

जालना :   जालना जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्याच्या दालनातून सहा धनादेशाची चोरुन करुन त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन ३३ लाख ०८ हजार ६२४ रुपये   वटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी मनोज निवृत्त गायकवाड, सुनिल सुधाकर रत्नपारखे यांच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  या घटनेने जिल्हा परिषद कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. 

१३ आॅगस्ट २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रोखपाल सिध्दार्थ पटेकर, विजय खापरे,  किशोर शेजळवळकर हे नेहमी प्रमाणे काम करीत होते.  याचवेळी विजय खापरे व सिध्दार्थ पटेकर यांनी  जिल्हा परिषदेच्या उप कर योजना व हस्तांतरीत योजनेचे धनादेश पाहिले असता, त्यांना सहा नसल्याचे लक्षात आले.  धनादेश नसल्याचे कळाल्यानंतर त्यांनी याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांना सांगितले.  त्यांनी सदर धनादेशाचा गैरवापर टाळण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाला स्टप पेमेंन्ट बाबत पत्र दिले.  तसेच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडे धनादेशांबाबत चौकशी केली. परंतु, कोणाकडेच ते धनादेश मिळाले नाहीत.

१९ आॅगस्ट रोजी बँकेच्या कर्मचाऱ्याने वित्त विभागाला माहिती दिली की,  मनोज गायकवाड व सुनिल रत्नपारखे यांच्या नावे ३३ लाख ०८ हजार ६२४  रुपयांचे धनादेश सादर केले आहेत. त्यानंतर वित्त अधिकाऱ्यांनी सदर बँकेत जाऊन धनादेशाची पाहाणी केली असता, सदर धनादेशावर लिहिलेला मचकुर हा वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी लिहिलेला नव्हता. तसेच दोन्ही धनादेशावर  पदनाम दशर्विणारा शिक्का व मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण धोंडीराम निर्मळ यांच्या फिर्यादीवरुन मनोज निवृत्ती गायकवाड व सुनिल सुधारकर  रत्नपारखे यांच्या विरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. मोरे हे करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी