वालसावंगी येथे जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST2021-01-25T04:31:34+5:302021-01-25T04:31:34+5:30

नेर येथे जयंतीनिमित्त अभिवादन नेर : जालना तालुक्यातील नेर येथील अभिजीत विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी ...

Anniversary celebration at Valsavangi | वालसावंगी येथे जयंती साजरी

वालसावंगी येथे जयंती साजरी

नेर येथे जयंतीनिमित्त अभिवादन

नेर : जालना तालुक्यातील नेर येथील अभिजीत विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक जी. एन. बुरुकुल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जी. एन. बुरुकुल, देशमुख, गरुड, मात्रे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

जिल्हा संयोजकपदी विकास कदम यांची निवड

जालना : भारतीय जनता पक्षाच्या जालना जिल्हा आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या जिल्हा संयोजकपदी विकास कदम यांची निवड केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे यांनी केली. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व मराठवाडा संयोजक हर्षवर्धन कराड यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब कोलते आदींनी स्वागत केले.

Web Title: Anniversary celebration at Valsavangi