शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! जीआय मानांकनानंतर जालन्याच्या दगडी ज्वारीस सर्वाधिक दर, लागवडही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:19 IST

जालना जिल्ह्यातील १०० एकरवर झाली होती लागवड; उताराही चांगला मिळाल्याने शेतकरी समाधानी

जालना : मागील वर्षी जालन्याच्या दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळाले आहे. यानंतर जालन्यातील दगडी ज्वारीला प्रसिद्धी मिळत आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे १०० एकरवर शेतकऱ्यांनी दगडी ज्वारीची लागवड केली होती. यातून शेतकऱ्यांना एकरी ९-१० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. या ज्वारीला बाजारपेठेत तब्बल चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

यापूर्वी जालना जिल्ह्यातील माेसंबीला जीआय मानांकन मिळाले आहे. यानंतर मोसंबीला नवी ओळख मिळाली आहे. यामुळे माेसंबीला देशात व विदेशात मागणी वाढली आहे. मागील वर्षी जालन्याच्या दगडी ज्वारीला जीआय मानांकन मिळाले आहे. या ज्वारीलादेखील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाचे भगवान मात्रे यांनी जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. पेटंट विभागाने या दगडी ज्वारीला मागील वर्षी भौगोलिक मानांकन दिले आहे. मात्रेवाडी, पाडळी, वरूडी आदी परिसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात दगडी ज्वारीची लागवड केली होती.

शेतकऱ्यांचा प्रतिसादबदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६० रुपये प्रतिकिलो याप्रकरणे ज्वारी दगडीचे बियाणे घेऊन गेले होते. यातून तालुक्यात जवळपास १०० एकरवर दगडी ज्वारीची पेरणी झालेली होती. यंदा दगडी ज्वारीतून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे. कमी पाण्यामध्ये दगडी ज्वारीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादन मिळाले असून, प्रतिक्विंटल चार हजार रुपये असा उच्च दर मिळाल्याचे भगवान मात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना