शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अफवेने भोकरदनमध्ये खळबळ! 'बुलडाणा अर्बन'मधील सोने, ठेवी काढण्यासाठी खातेदारांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:35 IST

"बँक सुरक्षित आहे, अफवांना बळी पडू नका!" भोकरदन शाखाधिकाऱ्यांचे खातेदारांना आवाहन

भोकरदन (जालना): भोकरदन येथील बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा सध्या चर्चेचा आणि गर्दीचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही पतसंस्था लवकरच बंद पडणार असल्याची अफवा सोशल मीडिया आणि नागरिकांमध्ये पसरल्याने, गेल्या दोन दिवसांपासून आपले तारण असलेले सोने आणि ठेवी काढून घेण्यासाठी खातेदारांनी बँकेत मोठी गर्दी केली आहे. यामुळे बँकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून खातेदारांना समजावण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरल्याने कर्मचारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

काय आहे गर्दीचे कारण? 
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातून ही अफवा पसरण्यास सुरुवात झाली. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने आपले तारण असलेले सोने सुरक्षित राहावे, या भीतीने नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. भोकरदन तालुक्यात यापूर्वी ज्ञानराधा, रायसोनी आणि मलकापूर अर्बन यांसारख्या बँका व पतसंस्थांमध्ये अनेकांचे पैसे अडकल्याने नागरिक अधिकच घाबरले आहेत. "आधी माझे पैसे द्या, मग इतरांचे," अशी मागणी करत शाखेत मोठी रेटारेटी सुरू असून बँक कर्मचारी या गर्दीमुळे अडचणीत आले आहेत.

शाखाधिकाऱ्यांचा दावा: बँक सुरक्षित! 
भोकरदनचे शाखाधिकारी दिलीप ताठे यांनी या अफवांचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, "आमच्या बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. १ जानेवारी रोजी एका दिवसात नागरिकांनी १ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा करून आपले सोने परत नेले आहे. शाखेत एकूण १६ कोटी रुपयांचे सोने तारण आहे आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊ नये." एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने कामावर ताण येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या मनात भीतीचे सावट 
घोटाळा झाल्याने पतसंस्था बंद पडण्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्याने ग्रामीण भागातील खातेदार अफवांवर लवकर विश्वास ठेवतात. भोकरदन शाखेतील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसली तरी, बँकेने व्यवहार सुरळीत असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rumor Sparks Chaos: Depositors Rush to Withdraw from Buldhana Urban

Web Summary : A rumor of imminent closure triggered panic at Buldhana Urban Co-operative Bank in Bhokardan. Account holders rushed to withdraw deposits and gold, overwhelming staff despite assurances of the bank's stability. Past bank failures fuel public fear.
टॅग्स :bankबँकJalanaजालना