शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

२०० महिलांचा कुटुंब नियोजनात पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे ...

जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी पुरूषांनी मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे कानाडोळा केला आहे. गत महिन्यापासून जिल्ह्यात २०० महिलांनी शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येतो. जे महिला व पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतात. त्यांना शासनातर्फे मदतदेखील केली जाते. सर्वसामान्य महिलेला २५० रूपये तर अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील महिलांना ६५० रूपये दिले जातात. पुरूषांनी नियोजन शस्त्रक्रिया केली तर १०० रूपये दिले जातात.

मागील दहा ते अकरा महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवरही परिणाम झाला. मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. लॉकडाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने मागील महिन्यापासून पुन्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. आतापर्यंत २०० महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

हसनाबाद आरोग्य केंद्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील आरोग्य केंद्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या केंद्रात ५१ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर रेणुकाई पिंपळगाव ३८, दहिफळ खंदारे २५, ढोकसाळ ३२, वाटूर १२, खासगाव १७, तर शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद होत्या. मागील महिन्यापासून शस्त्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात २०० महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. एकाही पुरूषाने शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला नाही. महिलांसह पुरूषांनीही शस्त्रक्रिया करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.