शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील ३९ प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के उपयुक्त पाणी आहे. जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक असून, १७ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली आहे.पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी गावा-गावातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १७ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तर ३ प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. एका प्रकल्पात २६ ते ५० टक्के, एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. तर तीन प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणी आहे. या तीन प्रकल्पांमध्ये साधारणत: ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यात भोकरदन तालुक्यातील रेलगाववाडी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जाफराबाद तालुक्यातील भारज लघू पाझर तलावात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.जायकवाडी प्रकल्प भरल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. या नदीपात्रातील बॅरेजमुळे संबंधित गाव, शिवारातील पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, इतर शहरी, ग्रामीण भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यात असलेल्या ७ बंधाऱ्यांपैकी केवळ दोन बंधाºयांमध्ये ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. तर इतर बंधा-यांमध्येही पाणीसाठा झालेला नाही.दरम्यान, पुढील आठ- दहा दिवसात मोठा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न यंदाही मोठा गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तर जालना तालुक्यातील कल्याण गिरजा, कल्याण व जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा हे प्रकल्प जोत्याखाली आहेत. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पही जोत्याखाली आहे. तर तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पही कोरडाठाक आहे.मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ८.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा याच कालावधीत मध्यम प्रकल्पांमध्ये २१.२३ टक्के उपयुक्त पाणी आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असली तरी प्रकल्पांची तहान मात्र कायम आहे. त्यामुळे पुढील कालावधीत तरी जिल्ह्यात मोठा पाऊस पडेल, अशी आशा सर्वसामान्यांना लागली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणwater shortageपाणीकपात