इंग्रजीतील ‘द’ शब्दाची ईबेवर विक्री करणार

By Admin | Updated: May 25, 2014 23:57 IST2014-05-25T23:57:18+5:302014-05-25T23:57:43+5:30

आॅस्ट्रेलियातील एका अतिउत्साही व्यक्तीने रद्दी कागदावरील तुकड्यांवर लिहिलेला इंग्रजी शब्द ‘द’ची विक्री करण्याची तयारी चालवली आहे

The word 'd' in English will be sold on eBay | इंग्रजीतील ‘द’ शब्दाची ईबेवर विक्री करणार

इंग्रजीतील ‘द’ शब्दाची ईबेवर विक्री करणार

मेलबर्न : आॅस्ट्रेलियातील एका अतिउत्साही व्यक्तीने रद्दी कागदावरील तुकड्यांवर लिहिलेला इंग्रजी शब्द ‘द’ची विक्री करण्याची तयारी चालवली आहे. यासाठीची बोली अगोदरच १,०२५ आॅस्ट्रेलियन डॉलरवर पोहोचली आहे. या बोलीसाठी अगोदरच ४३ जणांनी सहभाग घेतला आहे. आतापर्यंत सर्वाधिक बोली १,०२५ आॅस्ट्रेलियन डॉलर असून ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. विक्रेता ‘स्वीटीमॅन’ म्हणाला, मी ‘द’ शब्दाची विक्री करत आहे. ही मनोरंजक वस्तू हाताच्या तळव्यावर, पिशवी आणि बटव्यात सहजपणे ठेवता येऊ शकते.

Web Title: The word 'd' in English will be sold on eBay