शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 08:52 IST

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात. मात्र, सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात. हा मिरज पॅटर्न तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे.

- हणमंत पाटीलसांगली - महायुतीचे उमेदवार व भाजपचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे मिरज राखीव मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात. मात्र, सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात. हा मिरज पॅटर्न तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे. या निवडणुकीत सुरेश खाडे यांच्या विजयाचा वारू रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते रिंगणात उतरले आहेत. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते किती मदत करतात, यावर खाडे विरुद्ध सातपुते या लढतीत विजयाची समीकरणे ठरतील.

 लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय? लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना या मतदारसंघातून २४ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे संजयकाका पाटील यांना मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मिळाली होती.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे'आरोग्यपंढरी' अशी ओळख असलेल्या मिरजेतील प्रसिद्ध मिशन रुग्णालय (वानलेस) डबघाईला आले आहे. मतदारसंघातील कामगारमंत्री असूनही या रुग्णालयातील कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही. २ सलग तीन वेळा निवडून येऊनही मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, गटारी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी यांसारखे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४miraj-acमिरजBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी