शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

नवं संकट! आज सौर वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता; बत्ती गुल होणार, मोबाईल सिग्नल जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:14 PM

वेगवान सौर वादळ आज पृथ्वीला धडकण्याची दाट शक्यता

सौर वादळ अतिशय वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत असल्याचा इशारा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी दिला आहे. पुढील काही तासांत हे वादळ पृथ्वीला धडकू शकतं. त्याचा थेट परिणाम वीज पुरवठ्यावर होईल. वीज ग्रीड ठप्प होण्याचा धोका असल्यानं वीज पुरवठा खंडित होईल. मोबाईल सिग्नल आणि जीपीएसवरदेखील याचा प्रभाव दिसून येईल. अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पाहायला मिळतील.

पृथ्वीवर येणाऱ्या सौर वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशननं अलर्ट जारी केला आहे. भू-चुंबकीय वादळामुळे पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये वीज कोसळू शकते. यामुळे वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

उपग्रहांचं नुकसान होणार?सौर वादळाचा सर्वाधिक परिणाम आज पाहायला मिळेल, असं अमेरिकन नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकन स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या दिशेनं सरकणारं सौर वादळ जी-२ श्रेणीत मोडतं. यामुळे अनेक उपग्रहांना फटका बसू शकतो.