युद्ध भडकले! इस्रायल-अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, स्फोटात ५१ शाळकरी मुलींचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 18:25 IST2026-02-28T18:24:42+5:302026-02-28T18:25:35+5:30

40 schoolgirls killed in Israeli US - Iran War: इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट

war updates schoolgirls killed and injured as israeli us attacks iranian girls elementary school in Minab iranian media reported | युद्ध भडकले! इस्रायल-अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, स्फोटात ५१ शाळकरी मुलींचा बळी

युद्ध भडकले! इस्रायल-अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, स्फोटात ५१ शाळकरी मुलींचा बळी

40 schoolgirls killed in Israeli US - Iran War: इस्रायल-अमेरिकेने इराणमधील साधारण ३० विविध ठिकाणांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले आहेत. या लष्करी कारवाईदरम्यान इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात ५१ विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच ६०हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी याला दुजोरा दिला असून, या घटनेमुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याने या संघर्षाला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

शाळेवर हल्ला, तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त एअर स्ट्राइक्समध्ये एका शाळेला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये ४० शाळकरी मुली जागीच ठार झाल्या, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये एकामागून एक भीषण स्फोट झाले. या हल्ल्यांमुळे संपूर्ण इराणमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मोठी लष्करी कारवाई

या मोहिमेला 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) असे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्र आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. पण या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही जशास तसे उत्तर देण्याची धमकी दिली आहे. इराणी समर्थित 'कताईब हिजबुल्ला' (Kataib Hezbollah) या संघटनेने अमेरिकन तळांवर हल्ले करण्याची तयारी दर्शवली आहे.

इराणमधील भारतीयांसाठी सतर्कतेचा इशारा: इराणमधील बिघडलेली परिस्थिती पाहता, तेथील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिक आणि प्रवाशांसाठी 'अँडव्हायझरी' जारी केली आहे. भारतीयांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भीषण युद्धामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title : इजराइल-अमेरिका का ईरान पर हमला, स्कूल में छात्राएं हताहत, युद्ध गहराया।

Web Summary : इजराइल-अमेरिका ने ईरान पर हवाई हमले किए, जिसमें एक स्कूल पर हमला हुआ और 51 छात्राएं मारी गईं। तेहरान और अन्य शहरों में विस्फोट हुए। ईरान ने जवाबी कार्रवाई की धमकी दी, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया। भारतीय दूतावास ने नागरिकों को सुरक्षित रहने की सलाह दी।

Web Title : Israel-US strike Iran, school hit, many killed, war escalates.

Web Summary : Israeli-US airstrikes targeted Iran, hitting a school and killing 51 students. Tehran and other cities experienced explosions. Iran threatens retaliation, heightening Middle East tensions. Indian embassy advises citizens to stay safe.