अमेरिकेचे ६ अणुबॉम्ब हरवले, शोधूनही...; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दाव्याने उडविली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:03 IST2026-03-11T14:01:00+5:302026-03-11T14:03:01+5:30
Broken Arrow Incidents: अमेरिकन लष्कराचे ६ अणुबॉम्ब अद्याप बेपत्ता आहेत. १९५८ आणि १९६६ मधील घटना पुन्हा चर्चेत. इराण युद्धाच्या काळात या बेपत्ता अण्वस्त्रांमुळे जगावर धोक्याची घंटा. वाचा सविस्तर.

अमेरिकेचे ६ अणुबॉम्ब हरवले, शोधूनही...; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दाव्याने उडविली खळबळ
वॉशिंग्टन: रशिया-युक्रेन आणि आता इराण-इस्रायल युद्धाच्या ठिणगीने जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. मात्र, अशा तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेच्या एका जुन्या गुपिताने जगाची झोप उडवली आहे. अमेरिकन सैन्य आतापर्यंत आपले ६ शक्तिशाली अणुबॉम्ब गमावून बसले असून, ते अद्याप सापडलेले नाहीत. जर यापैकी एकही बॉम्ब चुकून शत्रूच्या किंवा दहशतवाद्यांच्या हाती लागला, तर भीषण हाहाकार घडू शकतो, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
काय आहे 'ब्रोकन ॲरो' घटना?
अण्वस्त्रांच्या वाहतुकीदरम्यान होणारे अपघात, बॉम्ब चोरीला जाणे किंवा चुकून पडणे या घटनांना अमेरिकन लष्करी भाषेत 'ब्रोकन ॲरो' म्हटले जाते. इतिहासात आतापर्यंत अशा ३२ घटना घडल्या आहेत. त्यातील ३२ पैकी २६ वेळा अमेरिकेने आपले अण्वस्त्र परत मिळवले, पण ६ अणुबॉम्ब आजही बेपत्ता आहेत.
कधी आणि कुठे झाले अपघात?
१९५८ चा हायड्रोजन बॉम्ब: टायबी बेटाजवळ एका विमानाची धडक झाल्याने १५ टनाचा हायड्रोजन बॉम्ब समुद्रात पडला. २ महिने शोध घेऊनही तो सापडला नाही. हा बॉम्ब नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १९० पटीने अधिक शक्तिशाली आहे.
१९६६ चा थरकाप: स्पेनच्या समुद्रात दोन विमानांच्या धडकेनंतर ४ थर्मोन्यूक्लियर बॉम्ब पडले. त्यातील ३ सापडले, पण एकाचा 'वॉरहेड' अद्याप बेपत्ता आहे.
इराण युद्धामुळे भीती का वाढली?
सध्या अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ल्याची धमकी दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेला हे हरवलेले बॉम्ब शोधता आले नाहीत, तर इराण किंवा इतर शत्रू देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते शोधू शकतात. बेपत्ता असलेला एक बॉम्ब एका संपूर्ण शहराला आणि लाखो लोकांना काही सेकंदात नष्ट करण्यास पुरेसा आहे.