शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 09:21 IST

Donald Trump vs Kamala Harris, US Election 2024: 'स्विंग स्टेट्स'मध्ये दोघांमधील अंतर खूपच कमी असते, त्यामुळे त्याचे निकाल येईपर्यंत कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नाही.

Donald Trump vs Kamala Harris, US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा जवळ येत असून निकालही येऊ लागले आहेत. आतापर्यंत एकूण ५० राज्यांपैकी ३० राज्यांचे निकाल आले आहेत. यापैकी २० मध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि १० राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस विजयी झाल्या आहेत. आता ७ स्विंग स्टेट्स काय निकाल देतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

'स्विंग स्टेट्स'कडे साऱ्यांचे लक्ष

मतदानाच्या अंदाजाचा विचार करता, आतापर्यंत मतदानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राज्यांनी कमला हॅरिय यांना विजय मिळवून दिला आहे. तर रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी कौल दिला आहे. त्यामुळे आता ७ स्विंग स्टेट्सचे निकाल येईपर्यंत कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नाही. उत्तर कॅरोलिना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि ऍरिझोना अशी ही ७ राज्ये आहेत. स्विंग स्टेट्स ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी असते. त्यामुळे या राज्यांमध्ये पारडे कुणाच्याही बाजूने झुकू शकते.

कमला जिंकल्या तर इतिहास रचला जाणार

५३८ इलेक्टोरल मतांसाठी म्हणजेच अमेरिकेतील ५० राज्यांमधील जागांसाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता मतदानाला सुरुवात झाली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व राज्यांमध्ये मतदान संपल्यावर पुढील चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. सध्याच्या आकडेवारीनुसार तरी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबतच संसदीय निवडणुकीतही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला आघाडी मिळालेली आहे. पण जर या निवडणुकीत कमला हॅरिस जिंकल्या तर २३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळेल.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionKamala Harrisकमला हॅरिसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाAmericaअमेरिकाVotingमतदानElectionनिवडणूक 2024