शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: July 16, 2014 23:37 IST

अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तालिबानचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर याच भागामध्ये कारवाई करत आहे

इस्लामाबाद : अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तालिबानचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर याच भागामध्ये कारवाई करत आहे. मानवरहित विमानांनी दताखेल भागात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य बनविले. ड्रोन विमानातून चार क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार १८ दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. याच क्षेत्रात गेल्या एक आठवड्यात झालेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. यापूर्वी १० जुलै रोजी करण्यात आलेल्या हल्ल्यात सात दहशतवादी मारले गेले होते. पाकिस्तानने यापूर्वी या हल्ल्याबाबत आपणास माहिती नसल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्याने याबाबत कडक पवित्रा घेत हा हल्ला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे सांगितले. पाकिस्तानने यापूर्वीही ड्रोन हल्ल्याला विरोध केला आहे. पाक लष्कर ज्या भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहे त्याच भागात ड्रोन हल्ले होत आहेत हे उल्लेखनीय. मध्यंतरी अमेरिकेने ड्रोन हल्ले थांबवले होते. तालिबानसोबतच्या शांतता चर्चेला वाव मिळावा म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलले होते. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. (वृत्तसंस्था)