कोरोना संकटापूर्वी मिळालेला अमेरिकेचा B1-B2 व्हिसा आता वैध आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 12:50 PM2020-08-08T12:50:17+5:302020-08-08T12:50:58+5:30

कोरोना संकटाच्या सामना करणाऱ्या अमेरिकेनं काही देशांमधील प्रवाशांवर बंदी घातली आहे

Is the US B1 B2 visa obtained before the Corona pandemic now valid | कोरोना संकटापूर्वी मिळालेला अमेरिकेचा B1-B2 व्हिसा आता वैध आहे का?

कोरोना संकटापूर्वी मिळालेला अमेरिकेचा B1-B2 व्हिसा आता वैध आहे का?

Next

प्रश्न- मला कोरोना महामारी येण्यापूर्वी B1-B2  व्हिसा मिळाला. तो आताही वैध आहे का? मी अमेरिकेला जाऊ शकतो का?
उत्तर: कोरोनाच्या आधी जारी करण्यात आलेले व्हिसा आताही वैध आहेत. बी१-बी२ व्हिसा धारकांच्या अमेरिकेत येण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र काही भौगोलिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्याबद्दल सजग असायला असावं.

व्यवसायासाठी आणि पर्यटनासाठी वैध व्हिसा आणि पासपोर्टच्या आधारे अमेरिकेत येणाऱ्यांचं स्वागत आहे. बिझनेस व्हिसावर प्रवास करणारे त्यांच्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून परिषदेत सहभागी होतात किंवा व्यवसायिक व्यवहार करतात. पर्यटन व्हिसावर आलेले प्रवासी पर्यटन स्थळांना भेटी देतात, त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना भेटतात किंवा वैद्यकीय उपचार घेतात.

अमेरिकेत येण्याच्या आधीचे १४ दिवस खाली दिलेल्या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये चीन (हाँगकाँग आणि मकाऊमधील विशेष प्रशासकीय विभागाचा अपवाद), इराण, शेंगन, युके, रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि ब्राझीलचा समावेश आहे. या भागांमधून येणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.

नेहमीच्या व्हिसा ऑपरेशन्ससाठी सध्या दूतावास बंद आहे. दूतावास कधी सुरू होणार याची माहिती संकेतस्थळावर देण्यात येईल. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असल्यास ते तुम्ही support-india@ustraveldocs.com वर ई-मेल करू शकता.
 

Web Title: Is the US B1 B2 visa obtained before the Corona pandemic now valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.