आकाशातून इराणची क्षेपणास्त्रे पडत होती, युद्धाच्या छायेत भारतीयाने ३७ कोटींची लॉटरी जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:47 IST2026-03-10T09:47:18+5:302026-03-10T09:47:45+5:30

UAE Lottery 37 crore jackpot winner Indian : युएईमध्ये भारतीय ड्रायव्हरचे नशीब चमकले! १५ वर्षांपासून लॉटरी घेणाऱ्या भारतीयाला ३७ कोटींचा जॅकपॉट लागला. वाचा या 'छप्परफाड' विजयाची रंजक गोष्ट.

UAE Lottery 37 crore jackpot winner Indian : Iranian missiles were falling from the sky, and an Indian won a lottery worth 37 crores | आकाशातून इराणची क्षेपणास्त्रे पडत होती, युद्धाच्या छायेत भारतीयाने ३७ कोटींची लॉटरी जिंकली

आकाशातून इराणची क्षेपणास्त्रे पडत होती, युद्धाच्या छायेत भारतीयाने ३७ कोटींची लॉटरी जिंकली

अबु धाबी: 'सब्र का फल मीठा होता है' ही म्हण एका भारतीय ड्रायव्हरने खरी करून दाखवली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून 'बिग तिकीट' लॉटरी खरेदी करणाऱ्या मुनवर फिरोज या भारतीय व्यक्तीला तब्बल १५ दशलक्ष दिरहम, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३७ कोटी रुपयांचा भव्य जॅकपॉट लागला आहे. अबुधाबीवर इराणची क्षेपणास्त्रे आदळत असताना या भीतीच्या छायेखाली ही लॉटरी काढण्यात आली. 

हा विजेता गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने लॉटरीचे तिकीट खरेदी करत होता. अनेक वेळा अपयश येऊनही त्याने आशा सोडली नव्हती. इराण युद्ध सुरु झाले तेव्हा फिरोज याने मागचापुढचा विचार न करता लॉटरीचे तिकीट खरेदी केले. या काळात अबुधाबीवर इराणचे ड्रोन, मिसाईल हल्ले होत होते. अशातच युद्धाच्या छायेत रविवारी 'बिग तिकीट' चा लकी ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉमध्ये फिरोज याच्या तिकीट क्रमांकाची घोषणा होताच त्याचे आयुष्य बदलले आहे.

अनेकदा अशा लॉटरीमध्ये मित्र किंवा सहकाऱ्यांचा वाटा असतो. या विजेत्यानेही आपल्या काही सहकाऱ्यांसोबत मिळून हे तिकीट खरेदी केले होते, त्यामुळे ही रक्कम आता त्यांच्यात विभागली जाणार आहे. या विजयानंतर आता फिरोज हा आपल्या मायदेशी, म्हणजेच भारतात परत येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत आहे.

Web Title : ईरान के मिसाइल हमलों के बीच भारतीय ने जीती लॉटरी।

Web Summary : अबू धाबी में एक भारतीय ड्राइवर ने 15 साल से लॉटरी टिकट खरीदते हुए, ईरान के मिसाइल हमलों के बीच 37 करोड़ का जैकपॉट जीता। वह भारत लौटकर व्यवसाय शुरू करने और अपने परिवार के सपने पूरे करने की योजना बना रहा है। पुरस्कार सहयोगियों के साथ साझा किया जाएगा।

Web Title : Indian wins lottery amid Iran missile strikes on Abu Dhabi.

Web Summary : An Indian driver in Abu Dhabi, buying lottery tickets for 15 years, won a 37 crore jackpot amidst Iran's missile attacks. He plans to return to India, start a business, and fulfill his family's dreams. The prize will be shared with colleagues.