शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 07:41 IST

Hong Kong Cargo Plane Skid: दुबईहून हाँगकाँगला पोहोचलेले हे विमान स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ३:५० वाजता उत्तर दिशेकडील धावपट्टीवर उतरत होते.

हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे एक अत्यंत दुर्मिळ आणि भीषण अपघात घडला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये नोंदणीकृत असलेले एक कार्गो विमान धावपट्टीवरून घसरले आणि थेट समुद्रात कोसळले.

दुबईहून हाँगकाँगला पोहोचलेले हे विमान स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ३:५० वाजता उत्तर दिशेकडील धावपट्टीवर उतरत होते. रनवेवर लँडिंग सुरू असताना, सुमारे ९० किलोमीटर प्रति तास (४९ नॉट्स) वेगाने असलेले हे विमान एका वाहनाशी धडकले आणि पुढे सरकले.

अपघातात दोन जण ठारया अपघातात विमानातील चार क्रू मेंबर सुरक्षित बचावले आहेत, मात्र त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, या धडकेमुळे विमानतळावर कार्यरत असलेले दोन ग्राउंड स्टाफ समुद्रात फेकले गेले. त्यांना तातडीने वाचवण्यात आले असले तरी, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरणाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. हाँगकाँग सरकारच्या फ्लाइंग सर्विसचे हेलिकॉप्टर आणि फायर सर्विस विभागाच्या बोटी बचाव कार्यात सामील झाल्या होत्या.

सुरक्षिततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हाँगकाँग विमानतळावर हा अपघात एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. घटनेनंतर, अपघातामुळे प्रभावित झालेला उत्तर दिशेकडील रनवे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : UAE Cargo Plane Crashes in Hong Kong, Two Ground Staff Dead

Web Summary : A UAE cargo plane crashed into the sea at Hong Kong airport, killing two ground staff. The plane, arriving from Dubai, veered off the runway during landing. The crew survived, but two airport workers died during treatment after being thrown into the sea. The north runway is closed.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटना