शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:40 IST

Turkey attacks Syria: सीरियाचा मित्रराष्ट्र समजल्या जाणाऱ्या तुर्कीने हल्ला का केला? समजून घ्या

Turkey attacks Syria: इस्रायल आणि सिरिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू होता. इस्रायलने सिरियाच्या संरक्षण मंत्रायलाची इमारत बॉम्बने आणि ड्रोनहल्ल्याने उद्ध्वस्त केली. त्यानंतर हा तणाव वाढला होता. पण सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांनी पलायन केल्यानंतर इस्रायल आणि सिरिया यांच्यात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. असे असूनही सोमवारी सीरियाच्या अलेप्पोमध्ये जोरदार बॉम्बहल्ला झाला. हा हवाई हल्ला इस्रायलने केला नाही, तर सीरियाचा मित्रराष्ट्र समजल्या जाणाऱ्या तुर्कीने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या तळांना लक्ष्य करण्यात आले.

इस्रायलने सीरियातील ड्रुझ समुदाय राहत असलेल्या जागेवर हल्ला थांबवले. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली. अशा परिस्थितीत, सीरियामध्ये शांतता स्थापित होत असतानाच, सोमवारी तुर्कीने सिरियावर हल्ला चढवला. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी सीरियातील उत्तर अलेप्पोमध्ये तुर्कीच्या लढाऊ विमानांनी मोठा हवाई हल्ला केला. SDFची लपण्याची ठिकाणे या विमानांनी लक्ष्य केली. सध्या या हल्ल्यात किती लोक मारले गेले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.

तुर्की 'मित्र' असूनही सीरियावर बॉम्बस्फोट का करतंय?

मित्र राष्ट्र तुर्कीने सीरियावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात एसडीएफला लक्ष्य केले होते. यामागील कारण YPG असल्याचे मानले जाते, हा कुर्दिश लढवय्यांचा एक गट आहे जो एसडीएफचे नेतृत्व करतो. तुर्की, अमेरिका या संघटनेला दहशतवादी संघटना मानतात. वायपीजी या संघटनेच्या कारवायांना तुर्की थेट आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानते. तुर्की सीरियाच्या सीमेतील सुमारे ३० किमी क्षेत्र एसडीएफच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ते सुरक्षित क्षेत्र घोषित करता येईल आणि सीरियन निर्वासितांना तेथे स्थायिक करता येईल. याशिवाय, SDFवर हल्ला करून तुर्की अमेरिकेवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहे.

टॅग्स :SyriaसीरियाIsraelइस्रायलBlastस्फोटTerrorismदहशतवाद