सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानं भडकले ट्रम्प, जगावर टाकला टॅरिफ बॉम्ब! आता किती शुल्क वसूल करणार अमेरिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 22:47 IST2026-02-21T22:47:08+5:302026-02-21T22:47:58+5:30

आर्थिक आणीबाणी कायद्याअंतर्गत लादलेल्या टॅरिफ विरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.

Trump, angered by the Supreme Court's decision, dropped a tariff bomb on the world How much duty will America collect now increase global tariffs from 10 to 15 percent | सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानं भडकले ट्रम्प, जगावर टाकला टॅरिफ बॉम्ब! आता किती शुल्क वसूल करणार अमेरिका?

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानं भडकले ट्रम्प, जगावर टाकला टॅरिफ बॉम्ब! आता किती शुल्क वसूल करणार अमेरिका?

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयाने जाम भडकल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ग्लोबल टॅरिफ'मध्ये पुन्हा एकदा मोठा बदल केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "आता अमेरिका जगभरातील देशांवर लादलेला १०% कर अथवा टॅरिफ १५% पर्यंत वाढवत आहे. अनेक देशांनी दशकांपासून अमेरिकेला लुटले आहे आणि हा निर्णय त्याच्या प्रत्युत्तरात घेण्यात आला आहे. आर्थिक आणीबाणी कायद्याअंतर्गत लादलेल्या टॅरिफ विरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.

"मेक अमेरिका ग्रेट अगेन" -
ट्रम्प म्हणाले, "आपल्या सरकारने हे पाऊल कायदेशीर चौकटीत राहून उचलले आहे. यापूर्वीही अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी टॅरिफ धोरण अत्यंत आवश्यक आहेत."  ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये "मेक अमेरिका ग्रेट अगेन" चा उल्लेख करत, भविष्यात अमेरिका "कायदेशीर" कर जाहीर करू शकते, असे संकेतही दिले.

अनेक देश दशकांपासून अमेरिकेला लुटत होते -
डोनाल्ड ट्रम्प ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हणाले, "अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून, मी १०% जागतिक कर १५% पर्यंत वाढवत आहे, जो तात्काळ प्रभावी असेल. मी येईपर्यंत, अनेक देश दशकांपासून अमेरिकेला पेनल्टी न देता लुटत होते. पुढील काही महिन्यांत, ट्रम्प प्रशासन नवीन, कायदेशीर शुल्क निश्चित करेल, जे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची आमची यशस्वी प्रक्रिया पुढे सुरू ठेवेल."



काय सांगतो अमेरिकन कायदा? - 
महत्वाचे म्हणजे, १९७४ च्या अमेरिकन व्यापार कायद्याच्या कलम १२२ नुसार राष्ट्रपतींना जास्तीत जास्त १५० दिवसांसाठी १५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा अधिकार आहे. मात्र याला काही मर्यादाही आहेत. कलम १२२ नुसार, कोणताही कर १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही आणि अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीशिवाय १५० दिवसांपेक्षा अधिक काळ लागू राहू शकत नाही.

Web Title : ट्रंप का टैरिफ गुस्सा: कोर्ट से झटका लगने के बाद वैश्विक शुल्क बढ़ाया।

Web Summary : अदालत के फैसले से नाराज ट्रंप ने वैश्विक शुल्क बढ़ाकर 15% कर दिया। उनका दावा है कि यह अमेरिका का शोषण करने वाले देशों के खिलाफ जवाबी कार्रवाई है और अर्थव्यवस्था को मजबूत करता है। आगे 'कानूनी' शुल्क का संकेत दिया गया है।

Web Title : Trump's Tariff Tantrum: Hikes Global Tariffs After Court Setback.

Web Summary : Furious over a court ruling, Trump increased global tariffs to 15%. He claims this retaliates against nations exploiting America and strengthens the economy. Further 'legal' tariffs are hinted at.