तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:47 IST2026-04-29T14:46:46+5:302026-04-29T14:47:09+5:30

International News: तब्बल ४० तास हृदयाची धडधड बंद राहिल्यानंतरही एक व्यक्ती आश्चर्यकारकरीत्या जिवंत राहिल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. या घटनेमुळे जीवनाचे रक्षण करण्याच्या नवीन उपचार प्रणालीबाबत ऑनलाईन चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे.

This person's heart stopped beating for 40 hours, yet he survived, a miracle... | तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...

तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...

तब्बल ४० तास हृदयाची धडधड बंद राहिल्यानंतरही एक व्यक्ती आश्चर्यकारकरीत्या जिवंत राहिल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. या घटनेमुळे जीवनाचे रक्षण करण्याच्या नवीन उपचार प्रणालीबाबत ऑनलाईन चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे.

झेजियांग विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील डॉक्टर लू जियो यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून या संदर्भातील माहिती प्रसिद्ध केल्यानंतर ही घटना जगासमोर आली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार लू यांनी सांगितले की, एका ४० वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. अनेकदा इलेक्ट्रिक डिफिब्रिलेशन दिल्यानंतरही त्याचं हृदय पुन्हा सुरू होऊ शकलं नाही. डॉक्टरांच्या पथकाने त्या व्यक्तीवर एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन केलं. तेव्हा त्याचे प्राण वाचले. मात्र या हृदयाची धडधड जवळपास दोन दिवस बंद होती.

ईसीएमओ एक जीवन रक्षक मशीन आहे. ती आर्टिफिशियल हृदय आणि फुप्फुसांप्रमाणे काम करते. तसेच ज्यांच्या अवयवांनी काम करणं बंद केलं आहे. अशा व्यक्तींच्या रक्तामध्ये ऑक्सिजन जोडण्याचं काम ही मशीन करते. या यंत्राचा वापर हृदयविकाराशी संबंधित रुग्ण आणि हृदय आणि फुप्फुसांच्या प्रत्यार्पणाचा सामना करत असलेल्या रुग्णांना तात्पुरता आधार म्हणून केला जातो. 
 

Web Title : 40 घंटे बिना धड़कन के जीवित रहा व्यक्ति: चमत्कार या चिकित्सा प्रगति?

Web Summary : चीन में एक व्यक्ति 40 घंटे तक बिना दिल की धड़कन के एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशन (ईसीएमओ) की बदौलत जीवित रहा। 40 वर्षीय व्यक्ति को दिल का दौरा पड़ा, और डॉक्टरों ने ईसीएमओ का उपयोग किया, जो एक कृत्रिम हृदय-फेफड़े की मशीन है, उसकी जान बचाने के लिए, जिससे उन्नत जीवन रक्षक उपचारों के बारे में चर्चा शुरू हो गई।

Web Title : Man Survives 40 Hours Without Heartbeat: Miracle or Medical Advance?

Web Summary : In China, a man survived for 40 hours without a heartbeat thanks to Extracorporeal Membrane Oxygenation (ECMO). The 40-year-old experienced cardiac arrest, and doctors used ECMO, an artificial heart-lung machine, to save his life, sparking discussions about advanced life-saving treatments.