शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"...तर भयानक परिणाम भोगावे लागतील"; किम जोंग यांच्या बहिणीचा अमेरिकेला थेट इशारा! काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:14 IST

किम यो जोंग यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदना म्हटले आहे की, "उत्तर कोरियाच्या सुरक्षेला कोणतेही आव्हान दिल्यास त्याचे 'भयानक परिणाम' भोगावे लागतील.

इराणमध्ये युद्ध सुरू असतानाच, उत्तर कोरियानेअमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावावर तेट भाष्य केले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग, यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या वार्षिक संयुक्त सैन्य अभ्यासावर अथवा युद्ध सरावावर कडक शब्दांत टीक केली आहे. जागतिक सुरक्षेच्या या अत्यंत संवेदनशील काळात, हा सराव प्रादेशिक स्थिरतेला मोठा धोका निर्माण करत असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटल आहे.

किम जोंग उन यांच्या बहिणीचा थेट इशारा - 
किम यो जोंग यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदना म्हटले आहे की, "उत्तर कोरियाच्या सुरक्षेला कोणतेही आव्हान दिल्यास त्याचे 'भयानक परिणाम' भोगावे लागतील. सोमवारपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाने ११ दिवसांचा 'फ्रीडम शील्ड' सराव सुरू केला आहे. यात हजारो सैनिक सहभागी झाले आहेत. 

इराण युद्धाचा उल्लेख न करता, किम यो जोंग म्हणाल्या, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा हा सराव प्रादेशिक स्थिरता बिघडवत आहेत. "जागतिक सुरक्षा व्यवस्था वेगाने कोसळत आहे आणि जगाच्या विविध भागात युद्धे सुरू आहेत. असे असतानाच, हे सर्व या बेपर्वा आणि बदमाश आंतरराष्ट्रीय गुंडांच्या कृत्यांममळे  घडत आहे." "फ्रीडम शील्ड" हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याद्वारे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दोन कमांड-पोस्ट सरावांपैकी एक आहे. हा सराव प्रामुख्याने संगणक सिम्युलेशनद्वारे केला जातो. या माध्यमाने दोन्ही देशांच्या संयुक्त युद्धक्षमतेची आणि नव्या सुरक्षा आव्हानांची चाचणी घेतली जाते. याशिवाय, 'वॉरियर शील्ड' नावाचा फील्ड ट्रेनिंग कार्यक्रमही राबवला जातो.

उत्तर कोरियाची आक्रमक भूमिका:
आपल्या देशाच्या वाढत्या अणुकार्यक्रमाचा संदर्भ देत किम यो जोंग म्हणाले, "बाह्य धोक्यांविरुद्ध उत्तर कोरिया आपली 'विनाशकारी शक्ती' सातत्याने मजबूत करत राहील. आम्ही आमच्या शत्रूंना युद्ध लढण्याच्या आमच्या क्षमतेसंदर्भात वारंवार खात्री पटवून देत राहू". उत्तर कोरिया या संयुक्त सरावांना नेहमीच 'हल्ल्याची रिहर्सल', असेच म्हणत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kim Jong Un's sister warns US of 'dire consequences'.

Web Summary : Kim Yo Jong warned the US and South Korea against joint military drills. She stated these exercises destabilize the region and threaten North Korea's security, vowing to strengthen its defense capabilities.
टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाAmericaअमेरिकाnorth koreaउत्तर कोरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प