शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 4:35 PM

यापूर्वी रविवारी काबुलमधील एका मशिदीबाहेर मोठा स्फोट झाला होता.

काबुल:अफगाणिस्तानाततालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेकदा देशात बॉम्बस्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता परत एकदा एका मोठ्या बॉम्बस्फोठाने अफगाणिस्तान हदरलंय. अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, हा स्फोट शिया मशिदीजवळ झाला. 

रविवारीही स्फोट झाला

यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी काबुलमधील एका मशिदीबाहेर जीवघेणा बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 5 नागरिक ठार झाले होते. तालिबानी अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, स्फोटात मृत्यू झालेले लोक तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मशिदीत जमले होते. त्या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नसली तरी, इस्लामिक स्टेटवर संशय आहे. ऑगस्ट महिन्यात काबुल ताब्यात घेतल्यापासून IS कडून तालिबानवर अनेक हल्ले करण्यात आले आहेत.

विमानतळाव सर्वात मोठा स्फोटतालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आयएसकडून होणारे हल्ले वाढले आहेत. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेटने काबुल विमानतळाबाहेर मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात 169 हून अधिक अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक मारले गेले होते.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानBombsस्फोटकेBlastस्फोटIslamic Stateइस्लामिक स्टेटKabul Bomb Blastकाबूल बॉम्बस्फोट