शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:07 IST

Israel Syria Conflict News: सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्रीही दमास्कस सोडून गायब झाले

सीरियाचेराष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा आणि संरक्षण मंत्री त्यांच्या कुटुंबीयांसह राजधानी दमास्कसमधून पळून गेल्याचे वृत्त आहे. अल मायादीन वृत्तपत्राने सरकारी सूत्रांचा हवाला देऊन हा दावा केला आहे. अल शारा यांनी कालच सिरियाशी युद्धाची भाषा केली होती. पण आज मात्र सीरियाच्या सैन्याने ड्रुझ समुदायाचे प्राबल्य असलेल्या स्वेदा प्रांतावर ताबा मिळवला असताना, अल शारा यांनी पळ काढल्याचे वृत्त समोर आले आहे. वृत्तपत्रानुसार, अल शारा आणि त्याचे कुटुंब इदबिबला रवाना झाले आहेत. सीरियातील इदबिब शहर हे तुर्कीच्या सीमेजवळ आहे. तर संरक्षणमंत्री कुठे गेले, याची माहिती मिळालेली नाही.

"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा

तुर्कीने २ दिवसांपूर्वी दिला होता सल्ला

१६ जुलैला जेव्हा इस्रायलने दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय आणि सीरियन लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला, तेव्हा तुर्कीने सीरियन राष्ट्राध्यक्षांना तात्काळ राष्ट्रपती भवन सोडण्याचा सल्ला दिला होता. टार्गेट किलिंगचा मुद्दा लक्षात आणून देत त्यांना हा सल्ला देण्यात आला होता. अहमद अल शरा इस्रायलच्या रडारवर आहेत. इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी हमास कमांडरसारखीच अल शारा यांची हत्या करू अशी घोषणा केली आहे. तसेच, इस्रायली सैन्याने १६ जुलै रोजी अहमद अल शारा यांच्या घराजवळ क्षेपणास्त्र हल्ला देखील केला होता.

सिरिया राष्ट्राध्यक्षांची युद्धाची भाषा

इस्रायलने सिरियावर हल्ल्या केल्यानंतर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांनी निवेदन जारी केले होते. त्यात म्हटले होते की, आम्ही युद्धाला घाबरत नाही, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य आव्हानांशी लढण्यात घालवले आहे. इस्रायलवर सीरियामध्ये जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एका आघाडीवर विजय मिळणे म्हणजे सर्वत्र विजय निश्चित असे होत नाही. सीरिया कोणताही बाह्य हस्तक्षेप स्वीकारणार नाही. विशेषतः ड्रुझच्या बाबतीत काहीही ऐकणार नाही, असे काल अल-शारा म्हणाले होते.

इस्रायली सैन्या टार्गेट किलिंगमध्ये निष्णात

इस्रायली सैन्य 'लक्ष्य हत्या' म्हणजे टार्गेट किलिंगमध्ये निष्णात आहे. गेल्या एका वर्षात, इस्रायली सैनिकांनी हिजबुल्लाह आणि हमासचे वरिष्ठ कमांडर, एक डझन इराणी अणुशास्त्रज्ञ आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. मध्य पूर्वेतील बहुतेक देशांमध्ये मोसादचे नेटवर्क मजबूत आहे. त्यामुळेच सर्व देश इस्रायलच्या टार्गेट किलिंगच्या दहशतीखाली आहेत.

टॅग्स :SyriaसीरियाIsraelइस्रायलPresidentराष्ट्राध्यक्ष