शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आयफाच्या पुरस्कार वितरण सोहळ््याला जोरदार प्रारंभ

By admin | Updated: June 6, 2015 01:58 IST

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (आयफा) वितरण सोहळ््याला गुरुवारी मलेशियातील क्वालालम्पूर येथे अतिशय उत्साहात प्रारंभ झाला.

डिप्पी वांकाणी - क्वालालम्पूर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (आयफा) वितरण सोहळ््याला गुरुवारी मलेशियातील क्वालालम्पूर येथे अतिशय उत्साहात प्रारंभ झाला. या कार्यक्रमानिमित्त जे उत्साहाचे वातावरण व उत्कंठा निर्माण झाली होती त्याबद्दल या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अभिनेत्यांनी आपल्या भावना प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. त्यात प्रामुख्याने सहभाग होता तो ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर व अनिल कपूर यांचा. त्यांनी हा चमकदार कार्यक्रम पार पाडण्यात कोणती भूमिका बजावली हे सांगितले.हृतिक रोशन याने त्याच्या मलेशियन चाहत्यांसाठी येथील अतिशय लोकप्रिय मॉलमध्ये कार्यक्रम सादर केला. आयफाच्या झगमगत्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हृतिक रोशन आपले वडील राकेश रोशन यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशनही करण्याची शक्यता आहे. माध्यमांशी बोलताना अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला की, मनोरंजन कायम राखण्याचे काम आम्हाला करायचे आहे. त्याच्यासोबत यावेळी रणवीर कपूर होता. रणवीर कपूर व अर्जुनने ‘गुंडे’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. वरूण धवनने ‘बदलापूर’ चित्रपटात नकारात्मक भूमिका स्वीकारून जोखीम घेतली होती तशी तू घेणार का, असे विचारता अर्जुन कपूर म्हणाला की मीदेखील ‘औरंगजेब’मध्ये वेगळी भूमिका स्वीकारून तशी जोखीम घेतली आहे. परंतु येथे बॉक्स आॅफीसचे नियम दर शुक्रवारी बदलत असतात. आव्हानात्मक भूमिका घ्यायला मी नेहमी तयार असतो.श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस म्हणाली, माझे मलेशियाशी भावनिक नाते आहे. माझी आई मलेशियन आहे व येथे कार्यक्रम सादर करणे ही फार मोठी संधी माझ्यासाठी आहे. मी मलेशियन नृत्य संघाबरोबर कार्यक्रम सादर करणार आहे. श्रीलंकेत बॉलिवूडचे चित्रपट खूप लोकप्रिय असूनही मला श्रीलंकेतील चित्रपटांत भूमिका करायला वेगळे काही वाटत नाही. आयफाचे आयोजन आयुष्यमान खुराणा याने केले आहे. तो म्हणाला की, ‘मी एटीव्ही रोडीज बघत नाही. ज्या कार्यक्रमात मी सहभागी होतो तोदेखील मी बघितलेला नाही.’ तुझ्या ‘दम लगाके हैशा’ चित्रपटात १९९० मधील संगीत का घेण्यात आले असे विचारता खुराणा म्हणाला की, ते संगीत अगदी ताजे असल्यासारखे वाटते म्हणून आम्हाला ते आमचे वाटते. आणि मी त्यात मला भूमिका मिळविण्यासाठी जवळपास १५ दिवस हरिद्वारला होतो.सुभाष घई हे उद््घाटन समारंभाला उपस्थित होते. ते म्हणाले, ‘आयफामुळे आमच्या चित्रपट संस्कृतीचा संपूर्ण जगात प्रसारच होत असतो. माझ्या काही चित्रपटांत या संस्कृतीचे दर्शनही घडले आहे.’ आदिती राव हैदरी हिच्या आगामी ‘वझीर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला. वझीरमध्ये अमिताभ बच्चन व फरहान अख्तर यांच्याही भूमिका आहेत. खूप उत्साहात असलेली आदिती म्हणाली की, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मला आदरयुक्त भीती असून ते व अख्तर यांच्यासोबत कार्यक्रम करायला मला अवघडल्यासारखे होते.