शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मालीच्या महिलेने दिला एकाचवेळी नवरत्नांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 07:00 IST

माली सरकारने वैद्यकीय उपचार आणि निगराणीसाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्कोला पाठवले.

बामको (माली) :  दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने एकाचवेळी नवरत्नांना जन्म दिला. जगातील ही अत्यंत दुर्मीळ घटना होय.  एकाचवेळी सहा बाळांना जन्म देण्याची घटना दुर्मीळ मानली जायची; हलिमा सिसाने एकाचवेळी पाच कन्या आणि चार पुत्ररत्नांना जन्म देण्याची घटना अद्‌भूतच म्हणावी लागेल.गर्भवती असताना हलिमा सिसाची मोरोक्को आणि मालीमध्ये  अल्ट्रासाऊंड यंत्राने तपासणी केली असता, ती सात बाळांना जन्म देईल, असे अपेक्षित होते.

माली सरकारने वैद्यकीय उपचार आणि निगराणीसाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्कोला पाठवले. मंगळवारी शस्त्रक्रियेद्वारे (सिजेरियन) तिची प्रसुती करण्यात आली असता, तिने नऊ बाळांना जन्म दिला. नऊ बाळांसह तिची प्रकृती ठीक आहे. डॉक्टर हलिमा आणि तिच्या बाळांच्या प्रकृतीविषयी चिंतीत आहेत. वैद्यकीय गुंतागुंत आणि एकाचवेळी नऊ बाळांना जन्म देणे म्हणजे काही बाळांची पूर्ण वाढ झाली नसावी, म्हणून डॉक्टर चिंतीत आहेत.

पाच कन्या, चार पुत्रnमालीतील एका इस्पितळात एका महिलेने एकाचवेळी नऊ बाळांना जन्म दिल्याची अत्यंत दुर्मीळ घटना घडल्याची माहिती नसल्याचे मोरोक्कोच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते रशिद कौधारी यांनी सांगितले. तथापि, आरोग्य मंत्रालयाने हलिमा सिसाने पाच कन्या आणि चार पुत्रांना जन्म दिल्याचे निवदेनात म्हटले आहे.nबाळांसह आईची प्रकृती ठीक आहे, असे आरोग्यमंत्री फान्टा सिबी यांनी म्हटले आहे. प्रसुतीवेळी हलिमासोबत असलेले डॉक्टर मला सातत्याने माहिती देत होते, असे त्यांनी म्हटले आहे. हलिमाची यशस्वी प्रसुती केल्याबद्दल सिबे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीSouth Africaद. आफ्रिका