शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विक्षिप्त परिचारकाने केली 106 रुणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 23:02 IST

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देवदूताची उपमा दिली जाते. पण या क्षेत्रामध्येही काही विकृतीही वावरत असतात. अशीच एक धक्का देणारी घटना...

 बर्लिन - वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देवदूताची उपमा दिली जाते. पण या क्षेत्रामध्येही काही विकृतीही वावरत असतात. अशीच एक धक्का देणारी घटना जर्मनीमध्ये उघडकीस आली आहे. जर्मनीमध्ये औषधांचे अधिक डोस देऊन एका परिचारकाने (ब्रदर) 106 रुग्णांचा जीव घेतल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, अजून काही मृतदेहांची तपासणी सुरू असल्याने या प्रकारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 
नील्स होजेल नामक 41 वर्षीय परिचारकाला 2015 साली केलेल्या दोन हत्यांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तसेच होजेलवर उत्तरी ब्रोमेनमधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या चार रुग्णांच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी ऑगस्ट महिन्यांत सांगितले होते की, होजेलने सुमारे 90 रुग्णांची हत्या केली आहे. या हत्यांपैकी बहुतांश प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच होजेलला 16 हत्यांप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 1999 पासून 2005 पर्यंत होजेल दोन स्थानिक रुग्णालयांमध्ये परिचारक होता. याचदरम्यान त्याने या हत्या केल्या.
   ओल्डेनबर्गमध्ये सरकारी पक्षाने सांगितले की, पुढील वर्षी होजेल याच्यावर अजून काही आरोप ठेवण्यात येणार आहेत. होजेल हा रुग्णाना जाणूनबुजून औषधांचा अधिक डोस देत असे. ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा झटका येत असे वा त्यांच्या शरीरातील एकेक अवयव निकामी होत असत. कहर म्हणजे यानंतर तो त्या रुग्णांवर उपचार करायचा आणि त्यातून  एकादा रुग्ण वाचलाच तर वरिष्ठांकडून त्याचे कौतुक होऊन नावलौकिक व्हायचा. 
 जर्मनीच्या इतिहासामधील ही एक विचित्र घटना आहे. होजेलच्या या कृत्यामुळे चिंताजनक परिस्थितीमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांला स्वास्थ लाभावे अशी प्रार्थना पोलिसांनी केली आहे. तसेच होजेलला आपण औषधांचा अतिरिक्त डोस किती रुग्णांना दिला हे माहित नाही. मात्र असे 30 वेळा घडल्याचे त्याने सांगितल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटल