शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 09:16 IST

Israel- Gaza Conflict : गाझामधील इस्रायलकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरु आहे.या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे मोठे विधान समोर आले आहे. गाझामधील इस्रायलकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, इस्रायलकडून होणाऱ्या कारवाईला मोहम्मद बिन सलमान यांनी नरसंहार म्हटले असून इस्रायलला इशाराही दिला आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, इस्रायली हल्ल्यासंदर्भात मुस्लिम आणि अरब देशांच्या नेत्यांची रियाधमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी लेबनॉन आणि इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यांवरही टीका केली. यादरम्यान मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टर प्रतिस्पर्धी तेहरानशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले. तसेच, इस्रायलला इशारा देतानाच त्यांनी इराणवर हल्ले करण्यात येऊ नये, असे सांगितले.

इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करा
सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलला इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. यासोबतच इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यास सांगितले. दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गाझामधील युद्ध थांबविण्यात आंतरराष्ट्रीय समुदायाचे अपयश असल्याचे म्हटले आहे.तसेच, इस्रायलवर या प्रदेशात उपासमार निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.

इस्रायलने नरसंहाराचे आरोप फेटाळले
इस्रायलने सातत्याने नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांच्या लष्करी कारवाईचा उद्देश दहशतवादी गट हमासला लक्ष्य करणे आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, बैठकीत नेत्यांनी गाझामधील संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी आणि सुविधांवर इस्रायलच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षsaudi arabiaसौदी अरेबिया