विदेशी विद्यार्थ्यांना वाढीव रोजगार परवान्याचा प्रस्ताव

By Admin | Updated: June 10, 2015 23:48 IST2015-06-10T23:48:57+5:302015-06-10T23:48:57+5:30

ओबामा प्रशासनाने गणित, विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकी (स्टेम) शाखेच्या शिक्षणासाठी अमेरिकेत येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना सहा वर्षांचा

Proposal of extended employment licenses to foreign students | विदेशी विद्यार्थ्यांना वाढीव रोजगार परवान्याचा प्रस्ताव

विदेशी विद्यार्थ्यांना वाढीव रोजगार परवान्याचा प्रस्ताव

वॉशिंग्टन : ओबामा प्रशासनाने गणित, विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकी (स्टेम) शाखेच्या शिक्षणासाठी अमेरिकेत येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना सहा वर्षांचा रोजगार परवाना देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वात जास्त लाभ भारतीय विद्यार्थ्यांना होईल.
सध्या अमेरिकेत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना (बिगर स्टेम श्रेणी) तेथे एकच वर्ष काम करण्याची मुभा आहे. याशिवाय विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त १७ महिने काम करण्याची मुभा दिली जाते. नव्या प्रस्तावामुळे परवान्याची व्याप्ती वाढणार आहे. (वृत्तसंस्था)




 

 

Web Title: Proposal of extended employment licenses to foreign students