पंतप्रधान मोदी नऊ वर्षांनंतर इस्रायल दौऱ्यावर; बेंजामिन नेतन्याहूंनी केले भव्य स्वागत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:36 IST2026-02-25T18:34:59+5:302026-02-25T18:36:16+5:30
PM Modi Israel Visit: PM मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

पंतप्रधान मोदी नऊ वर्षांनंतर इस्रायल दौऱ्यावर; बेंजामिन नेतन्याहूंनी केले भव्य स्वागत...
PM Modi Israel Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. तेल अवीव विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी नेतन्याहूंनी प्रोटोकॉल मोडत आपल्या मोदींना मिठी मारली. यावेळी पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
एक्स (X) वर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
Landed in Israel.
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
I am extremely honoured to be received by Prime Minister Netanyahu and Mrs. Netanyahu at the airport. I look forward to engaging in bilateral discussions and fruitful outcomes that strengthen the India-Israel friendship.@netanyahupic.twitter.com/FYGDv0M3Xy
इस्रायलमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्स (X) वर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, इस्रायलमध्ये पोहोचलो...विमानतळावर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि श्रीमती नेतन्याहू यांनी केलेल्या स्वागताने मी अत्यंत सन्मानित झालो आहे. द्विपक्षीय चर्चांमधून भारत-इस्रायल मैत्री अधिक मजबूत करणारे सकारात्मक परिणाम निघतील, अशी अपेक्षा आहे.
नेतन्याहू यांची पोस्ट
Israeli PM Benjamin Netanyahu responds to PM Narendra Modi's tweet, "It’s a great honor to welcome you to Israel, Prime Minister Modi. आपका स्वागत है..." pic.twitter.com/xqVp64fvOv
— ANI (@ANI) February 25, 2026
पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, पंतप्रधान मोदी, इस्रायलमध्ये आपले स्वागत करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. आपले हार्दिक स्वागत आहे.
9 वर्षांनंतर इस्रायलची दुसरी भेट
ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 9 वर्षांनंतरची दुसरी इस्रायल भेट आहे. यापूर्वी ते जुलै 2017 मध्ये इस्रायलला गेले होते. दौऱ्यादरम्यान 26 फेब्रुवारी रोजी उच्चस्तरीय डेलिगेशन बैठक होणार असून, पंतप्रधान मोदी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्ज़ोग यांचीही भेट घेणार आहेत.
दौऱ्याची वेळ महत्त्वाची
पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्याची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या मिडल ईस्टमध्ये तणावाचे वातावरण आहे. गाझामधील युद्ध थांबल्यानंतरही छिटपुट संघर्ष सुरूच असल्याने या भेटीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.
दरम्यान, भारत-इस्रायल संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि कूटनीती या मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चांकडे दोन्ही देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष केंद्रित झाले आहे.