शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान; हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 21वा अंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान तेथील पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी(11 मार्च) पंतप्रधान मोदींचा मॉरिशसच्या सर्वोच्च 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. पोर्ट लुईस येथे भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात रामगुलाम यांनी ही घोषणा केली.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखुळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींसमोर अनेक गोष्टी मांडल्या, ज्यात महाकुंभातील संगम पाणी आणि सुपर फूड मखाना यांचाही समावेश आहे. याशिवाय गोखुळ यांच्या पत्नी वृंदा गोखुळ यांना पंतप्रधानांनी बनारसी सिल्कची साडी भेट दिली आहे.

द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यावर चर्चामॉरिशसच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी X वर लिहिले, 'राष्ट्रपती धरमबीर गोखुळ यांच्यासोबत खूप चांगली भेट झाली. त्यांना भारताची आणि भारतीय संस्कृतीची चांगलीच ओळख आहे. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना अधिक प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.'

दुसऱ्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, 'मॉरिशसच्या स्टेट हाऊसमध्ये आयुर्वेदिक उद्यान तयार केले गेले हे कौतुकास्पद आहे. मॉरिशसमध्ये आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत आहे, याचाही मला आनंद आहे. अध्यक्ष धर्मबीर गोखुळ आणि मी आयुर्वेदिक गार्डनला भेट दिली, ज्यामुळे मला ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.'

पंतप्रधान मोदी 10 वर्षांनी मॉरिशसला पोहोचलेPM मोदी 10 वर्षांनंतर मॉरिशसला गेले आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी मार्च 2015 मध्ये मॉरिशसला भेट दिली होती. त्यावेळीही पंतप्रधान मोदी राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान, मॉरिशस आणि भारत यांचे जुने नाते आहे. तेथील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा