शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’कडून मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण

By admin | Updated: June 6, 2015 00:17 IST

इराक व सिरियातील मोठा प्रदेश गिळंकृत करणाऱ्या इसिस वा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आता ८ व ९ वर्षांच्या कोवळ्या मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण देण्याचे सत्र अवलंबले आहे.

त्रिपोली : इराक व सिरियातील मोठा प्रदेश गिळंकृत करणाऱ्या इसिस वा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आता ८ व ९ वर्षांच्या कोवळ्या मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण देण्याचे सत्र अवलंबले आहे. लिबियाच्या डेर्ना शहरात या दहशतवाद्यांनी एका सैनिकाचा शिरच्छेद केला. त्यावेळी जमलेल्या गर्दीत लहान मुलेही होती. या मुलांना पुढे बोलावून मारलेल्या माणसाचे शिर धडापासून कसे वेगळे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मुलांचे वय आठ वर्षांपर्यंत होते. इसिसच्या टेरर सेलचा जिहादी विलयत बाका याने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. मुलांनाही शिरच्छेद कसा होतो हे कळले पाहिजे, असे बाका याने म्हटले आहे. डेर्ना शहरावर इसिसने गेल्यावर्षी ताबा मिळवला आहे. लिबिया सरकारच्या सैनिकाला येथील मशिदीसमोर काफीर ठरवून ठार मारण्यात आले. त्याने लिबिया सरकारच्या वतीने इसिसशी लढा दिला होता. अब्दुलनबी शूरगावी, असे त्याचे नाव होते. शिरच्छेद करताना त्याला नारंगी रंगाचा जम्पसूट घालण्यात आला होता, तर शिरच्छेद करणाऱ्यांनी काळे कपडे घातले होते. शिरच्छेद केल्यानंतर त्याचे डोके हातात धरून मुलांना दाखविण्यात आले. हे दृश्य पाहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरही भीतीचे भाव नव्हते.(वृत्तसंस्था)