शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार करतय पंतप्रधान मोदींना फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 17:08 IST

पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानात दररोज कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा वाढतच आहे. पाकिस्तानात आतापर्यंत १७१७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर मात करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अनेक निर्णय घेत आहे. मात्र या निर्णयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयांची झलक दिसत आहे. यामुळे पाकिस्तान सरकार मोदींना फॉलो करतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापैकी ट्रेनमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. आता एसी कोच आणि बिझनेस क्लास ट्रेनचे रुपांतर आयसोलेश वॉर्डमध्ये करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. सरकारने या रेल्वेंमध्ये २००० आयसोलेशन बेड बनविण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी ही माहिती दिली आहे.

शेख राशिद यांनी सांगितले की, सध्या २२० कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येत आहे. वेळ भासल्यास हे वॉर्ड कुठंही घेऊन जाता येईल, अशा स्वरुपात हे वॉर्ड तयार करण्यात येत आहे. सध्या रावळपिंडी, पेशावर, लाहोर, कराची, क्वेटा, सुक्कर आणि मुल्तानमध्ये याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व मोबाईल आयसोलेशनमध्ये व्हेंटीलेटरच व्यवस्था करण्यात आली आहे.

याआधीच भारतात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारतीय रेल्वेने पाच हजार डब्ब्यांमध्ये आयसोलेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी याचा वापर सुरू करण्यात आला आहे. रेल्वे कारखान्यात याचे काम करण्यात येत आहे. भारतात १२५ रेल्वे हॉल्पिटल आहेत. यापैकी ७० हून अधिक रुग्णालय अपात्कालिन स्थितीसाठी सज्ज करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोना रुग्णांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.