शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:06 IST

Asim Munir Son information : आपल्या मुलाबद्दल असीम मुनीर यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया असीम मुनीर यांचा मुलगा काय करतो?

Asim Munir Son information : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यामुळे पाकिस्तानमधील एक नाव चर्चेत आले आहे. ते नाव म्हणजे असीम मुनीर. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर गेल्या काही दिवसांपासून भारताला सातत्याने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देताना दिसत आहेत. याचदरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना असीम मुनीर यांनी भारताला उद्देशून मोठे विधान केले आहे. मुनीर यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध कधीही थांबू शकत नाही. ते पुढे असेही म्हणाले की, माझ्या पश्चात्त माझा मुलगा भारताविरोधात लढेल आणि त्यानंतर माझा नातू भारताविरुद्ध युद्ध सुरू ठेवेल. आपल्या मुलाबद्दल असीम मुनीर यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया असीम मुनीर यांचा मुलगा काय करतो?

भारताविरूद्ध लढण्याची भाषा करणाऱ्या असीम मुनीरने ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आपल्या कुटुंबाला पाकिस्तानाबाहेर पाठवले होते. एवढेच नाही तर, ज्या रात्री भारताने रावळपिंडीवर हल्ला केला होता, त्या रात्री मुनीर आपला जीव वाचवण्यासाठी लष्कराच्या मुख्यालयाच्या बंकरमध्ये लपून बसला होता. मात्र आता तोच मुनीर भारताविरूद्ध युद्धाच्या वल्गना करताना दिसतो आहे.

मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो?

३ मुलांचे वडील असलेले असीम मुनीर २०२२ पासून पाकिस्तानचे लष्करप्रमुख पद भूषवत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे लग्न इरम नक्वी-मुनीर यांच्याशी झाले. इरम आणि असीम यांना ३ मुले आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. दोन्ही मुली मोठ्या आहेत आणि लंडनमध्ये राहतात. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांनी २०२२ मध्ये मुनीर कुटुंबावर एक रिपोर्टिंग केले होते. मुनीरच्या मोठ्या मुलीचे नाव खादीजा असीम आहे. खादीजाचे लग्न ब्रिटनमधील सुरक्षा विभागात तैनात असलेल्या उस्मानशी झाले आहे. नूरानीच्या मते, मुनीरच्या दुसऱ्या मुलीचे नाव सुंदास उझैर आहे. सुंदासचे लग्न उझैर अली शाहशी झाले आहे. उझैर पाकिस्तानी आहे. असीम मुनीरला एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या मुलाने ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे आणि तो त्याची आई इरमसोबत तिथे राहतो. मुनीर कुटुंबाने त्यांच्या मुलाबद्दल अधिक माहिती सार्वजनिक केलेली नाही.

 

मुनीरच्या कुटुंबात आणखी कोण आहे?

मुनीरच्या कुटुंबात दोन भाऊ आहेत. एक भाऊ शिक्षक होता, जो आता निवृत्त झाला आहे आणि रावळपिंडीमध्ये राहतो. मुनीरचा धाकटा भाऊ धर्माधिष्ठित मोहिम चालवतो. मुनीरचे वडीलही पाकिस्तानमध्ये इमाम म्हणून काम करायचे. मुनीरशिवाय कुटुंबात कोणीही सैन्यात नाही. मुनीर हे पाकिस्तानचे दुसरे असे लष्करप्रमुख आहेत, ज्यांना पदावर असताना फील्ड मार्शल ही पदवी देण्यात आली आहे. मुनीर हे पाकिस्तानमध्ये पडद्याआडून सरकार चालवतात असा त्यांच्यावर अनेकदा आरोप केला जातो.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाSoldierसैनिक