शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah Surgical Strike: अमित शाहांच्या सर्जिकल स्ट्राईकवर पाकिस्तान भडकला; भाजप, संघावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 19:00 IST

Pakistan react on Amit Shah's Surgical Strike: आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. या इशाऱ्यावर पाकिस्तान भडकला आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या नागरिकांच्या हत्यांचं पाकिस्तानकडून (Pakistan) समर्थन सुरू आहे.  दहशतवादी (Terrorist) सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिला होता. या इशाऱ्यावर पाकिस्तान (Pakistan) भडकला आहे. 

पूँछमध्ये हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. भारत सुरक्षेबद्दल जराही तडजोड करणार नाही असा संदेश त्यावेळी आपण जगाला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. भारताच्या सीमांशी छेडछाड करणं सोपं नाही आणि आम्ही आमच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत हा संदेश सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच जगाला अतिशय स्पष्टपणे दिला, असं शाह म्हणाले.

अमित शहांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. अमित शाह भडक विधान करत आहेत. त्यांनी हे विधान भ्रामक असल्याचे म्हणत निषेध व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे. भारताच्या गृहमंत्र्यांचे हे विधान भाजपा-आरएसएसची प्रवृत्ती दाखवितो. त्यांचा उद्देश क्षेत्रीय तनाव उत्पन्न करणे हा आहे. पाकिस्तानशी वैर पत्करणारे ही विचारधारा त्याना राजकीय दृट्या फायदा पोहोचविते असा आरोप केला आहे. 

अशा प्रकारची वक्तव्ये ही भारतात पसरत असलेला दहशतवाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन आदीवरून आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष भटकविण्याचे काम करतात. पाकिस्तानने नेहमी आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष भारताच्या या खतरनाक प्लॅनवर वळविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद