शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 12:26 IST

Jailbreak In Nigeria: या वर्षी एप्रिलमध्ये तुरुंगावर हल्ला करुन 1800 कैद्यांची सुटका केली होती.

अबुजा: तुम्ही प्रिझन ब्रेक म्हणजेच तुरुंग तोडून कैद्यांची सुटका केल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. पण, नायजेरियात एक असं प्रकरण घडलं आहे, ज्यात एका टोळीने तब्बल 800 कैद्यांची सुटा केली आहे. नायजेरियातील अबुजा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नायजेरियाच्या ओयो प्रांतात डाकूंच्या एका टोळीने तुरुंगावर हल्ला करुन आपल्या 800 साथीदारांची सुटका केली आहे. 

डायनामाइटने भिंत फोडलीमिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नायजेरिया कारागृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने बंदूकधारी जमा झाले. यानंतर त्यांनी कारागृहावर गोळीबार सुरू केला. कारागृहाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तर दिले, पण ते बंदूकधारी टोळीचा जास्त सामना करू शकले नाहीत. यानंतर डाकूंनी डायनामाइटने तुरुंगाची भिंत उडवली.

800 हून अधिक कैदी पसार

कारागृहाची भिंत उडवल्यानंतर दरोडेखोरांनी बंदुका घेऊन तुरुंगात प्रवेश केला आणि त्यांच्या साथीदारांची सुटका केली. कारागृहाची भिंत फोडल्यानंतर 834 कैदी कारागृहातून पळून गेले. मात्र, पोलिसांनी मोहीम राबवून 262 पळून गेलेल्या कैद्यांना पुन्हा ताब्यात घेतले असून 575 कैद्यांचा शोध सुरू आहे. सध्या सर्व फरार कैद्यांचा शोध सुरू आहे.

हल्लेखोरांकडून सतत तुरुंगांना लक्ष्य

उल्लेखनीय म्हणजे, डाकू सतत त्यांच्या साथीदारांना सोडवण्यासाठी तुरुंगांना लक्ष्य करत आहेत. ओयो प्रांतातील कारागृहावरील हल्ला हा या कारागृहावरील तिसरा मोठा हल्ला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये डाकुंनी इमो प्रांतातील तुरुंगावर हल्ला करून 1,800 कैद्यांची सुटका केली होती. याशिवाय गेल्या महिन्यात कोगी प्रांतातील दरोडेखोर तुरुंगावर हल्ला करून 266 कैद्यांची सुटका केली होती. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेPrisonतुरुंग