नेपाळचे नुकसान ७ अब्ज डॉलर

By Admin | Updated: June 15, 2015 01:23 IST2015-06-15T01:23:25+5:302015-06-15T01:23:25+5:30

नेपाळला बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्याने १० हजार लोकांचा बळी घेतला, हजारो घरांचे नुकसान झाले. नेपाळने आता या नुक सानीचा संपूर्ण

Nepalese losses 7 billion dollars | नेपाळचे नुकसान ७ अब्ज डॉलर

नेपाळचे नुकसान ७ अब्ज डॉलर

काठमांडू : नेपाळला बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्याने १० हजार लोकांचा बळी घेतला, हजारो घरांचे नुकसान झाले. नेपाळने आता या नुक सानीचा संपूर्ण आढावा घेतला असून, भूकंपात नेपाळचे ७ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
नेपाळच्या नियोजन आयोगाने हा अहवाल तयार केला आहे. २५ एप्रिलच्या भीषण भूकंपात नेपाळच्या मालमत्तेचे ५.१३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे असे अहवालात म्हटले आहे. पर्यावरण, शेती, शिक्षण, वीज, उद्योग, वाहतूक व सांस्कृतिक वारसा या क्षेत्रांना जबर फटका बसला आहे, त्याचे मूल्य १.६ अब्ज डॉलर इतके आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Nepalese losses 7 billion dollars