नरेंद्र मोदी पाकसाठी मोठा धोका -मुशर्रफ

By Admin | Updated: October 23, 2014 04:42 IST2014-10-23T04:42:56+5:302014-10-23T04:42:56+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.

Narendra Modi's big threat to Pakistan - Musharraf | नरेंद्र मोदी पाकसाठी मोठा धोका -मुशर्रफ

नरेंद्र मोदी पाकसाठी मोठा धोका -मुशर्रफ

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदर वक्तव्य करतानाच आपण कुठल्याही स्थितीत पाकिस्तान सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याच मुलाखतीत मुशर्रफ यांनी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला असून भारतविरोधी युद्धाची भूमिका घेत पाकिस्तानच्या राजकीय पटलावर पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न मुशर्रफ यांनी केला आहे.
या मुलाखतीदरम्यान मोदींवर कडाडून टीका करतानाच वाजपेयींनी पाळलेली लक्ष्मणरेखा मोदी ओलांडत असून त्यांच्या सर्व भाषणांमधून पाकिस्तानविरोध स्पष्ट दिसतो. शांतताप्रकियेसंबंधी मोदी गंभीर नसून त्यांनी त्यांची भूमिका बदलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
भारत बलुचिस्तानात पाकिस्तानविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत मुशर्रफ यांनी पाकिस्तानही काश्मिरमध्ये कारवाया करून याला जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी धमकी दिली.
पाकिस्तानातील लाखो लोक काश्मिरमधल्या आपल्या भावांना वाचवण्यासाठी भारतात घुसण्याची तयारी करत असल्याचे सांगताना आम्ही त्यांना थांबवले असल्याची धक्कादायक माहिती मुशर्रफ यांनी दिली. सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराबाबत बोलताना मुशर्रफ म्हणाले की पहिली आगळीक आम्ही केली असा भारताचा आरोप आहे, तर पहिल्यांदा गोळीबार भारताने केला असा आमचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Narendra Modi's big threat to Pakistan - Musharraf